नवी दिल्ली

दिवसागणिक कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. दोन दिवसांपासून देशात 60 हजारांपेक्षा जास्त करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, मागील 24 तासांत देशात 61 हजार 537 करोनाबाधित रुग्ण आढळे आहेत. तर गेल्या 24 तासांत 933 जणांचा मृत्यू झाला आहे.

 देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 20 लाख 88 हजार 612 इतकी झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे, उपचार घेत असलेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाण जास्त आहे. देशात आतापर्यंत 14 लाख 27 हजार 6 रुग्णांवर करोनावर मात केली आहे. सहा लाख 19 हजार 98 रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. आतापर्यंत 42 हजार 518 जणांचा  मृत्यू झाला आहे.

 

अवश्य वाचा

देशात 61 लाख कोरोनाबाधित

मधुकर कदम यांचे निधन