नवी दिल्ली,

कोरोना व्हायरस विरोधात लस निर्मिती निर्णायक टप्प्यावर आहे. भारताने लशीकरणामध्ये कोणाला प्रथम प्राधान्य मिळाले पाहिजे? त्यांची निवड करायला सुरुवात केली आहे. जवळपास 30 कोटी लोकांना लसीकरणामध्ये प्रथम प्राधान्य मिळू शकते. आघाडीवर राहून कोरोनाचा थेट सामना करणारे आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी, पोलीस, स्वच्छता कर्मचारी, को-मोर्बिडीटी असणारे लोक आणि वयोवृद्धांचा लसीकरणामध्य प्रथम प्राधान्य मिळू शकते. 30 कोटी लोकांच्या लशीकरणासाठी जवळपास 60 कोटी लशीचे डोस लागणार आहेत.

 प्राधान्यक्रमाच्या यादीत एकूण चारगट आहेत. यात 50 ते 70 लाख आरोग्य क्षेत्रातले कर्मचारी आहेत. पोलीस, महापालिका कर्मचारी आणि सैन्य दलातील जवान-अधिकारी असे मिळून दोन कोटीपेक्षा जास्त लोक आहेत. 50 वर्षापुढील 26 कोटी नागरिक आणि 50 पेक्षा कमी वय पण को-मोर्बिडीटी असणार्‍या नागरिकांचा समावेश आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

भारतात सध्या तीन लशी चाचणीच्या वेगवेगळया टप्प्यावर आहे. यात ऑक्सफर्ड-अस्त्राझेनेकाची लस सर्वात शेवटच्या म्हणजे तिसर्‍या फेजमध्ये आहे. भारतात या लशीचे उत्पादन करणारी सिरम इन्स्टियूट या लशीची मानवी चाचणी करत आहे. नोव्हेंबरच्या अखेरीस किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवडयात फेज तीनचा डाटा उपलब्ध होईल, असे सरकारकडून सांगण्यात आले आहे.

65 लाख रुग्णांची कोरोनावर मात

 नवी दिल्ली,

  गेल्या काही दिवसांच्या तुलनेत भारतात  कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचं दिसून येत आहे. गेल्या 24 तासांत देशात 62 हजार 212 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 837 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.65 लाख रुग्णांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे.

 आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या 74 लाख 32 हजार 681 इतकी झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे उपचार घेणार्‍या रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक आहे. देशात आतापर्यंत 65 लाख 24 हजार 596 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर सात लाख 95 हजार 87 कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहेत. देशात  कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या एक लाख 12 हजार 998 इतकी झाली आहे.

अवश्य वाचा

गर्भातील बाळाला दिले रक्त