Wednesday, May 19, 2021 | 03:02 AM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

गुजरातमध्ये कोव्हिड सेंटरला आग
01-May-2021 07:55 PM

 

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

महाराष्ट्रात रुग्णालयातील दुर्घटनांच्या घटना ताज्या असतानाच, गुजरात राज्यातही भरुच जिल्ह्यातील कोव्हिड केअर सेंटरमध्ये मोठी आग लागली. शुक्रवारी रात्री साडेबाराच्या सुमारास लागलेल्या आगीत एकूण 16 जणांचा होरपळून मृत्यू झाला. यामध्ये 14 कोरोनाबाधित रुग्णांसह दोन नर्सचा समावेश आहे. .

भरुच जिल्ह्यातील पटेल वेलफेअर रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांसाठी कोव्हिड केअर सेंटर बनवण्यात आले होते. चार मजली या कोव्हिड सेंटरमध्ये रात्रीच्या सुमारास मोठी आग लागली. आग लागल्यामुळे कोव्हिड सेंटरमध्ये दाखल असलेल्या रुग्णांना तातडीने जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले. परंतु, आग एवढी भीषण होती, की त्यात 16 जणांचा होरपळून मृत्यू झाला.

अग्निशमन दलाच्या जवानांनी एक तासात आगीवर नियंत्रण मिळवलं आणि सुमारे 50 रुग्णांना सुरक्षित बाहेर काढलं. परंतु, आगीचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, पोलीस प्रशासन घटनास्थळी हजर आहे.गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. राज्य सरकारच्या वतीने दुर्घटनेतील प्रत्येक मृतांच्या कुटुंबियांना चार लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top