Tuesday, April 13, 2021 | 02:03 PM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

राफेलच्या खरेदीत पुन्हा लाचखोरी- कॉँग्रेस
05-Apr-2021 08:57 PM

 

 । नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।

राफेल लढाऊ विमान खरेदी व्यवहारात भ्रष्टाचार झाल्याच्या काँग्रेसने पुन्हा एकदा आरोप केला आहे. हा मुद्या पुन्हा एकदा समोर आला असून, राफेल व्यवहारात भारतीय मध्यस्थाला डॅसॉल्टने 5 लाख युरो गिफ्ट म्हणून दिल्याचं वृत्त फ्रान्समधील मीडियानं दिलं आहे. यावरून काँग्रेसने आता मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी 2018 मध्ये याबाबत केलेले सगळे ट्विट्स खरे होते असं काँग्रेसकडून सांगण्यात आलं आहे. तसेच, पंतप्रधान मोदींनी याप्रकरणी चौकशी जाहीर केली पाहिजे, अशी देखील मागणी काँग्रेसकडून करण्यात आलेली आहे.फ्रान्सच्या पब्लिकेशन मीडियापार्टने दावा केला आहे की, 2016 मध्ये जेव्हा भारत-फ्रान्स यांच्यात राफेल लढाऊ विमानाबाबत करार झाला, त्यानंतर डॅसॉल्टने भारतात एका मध्यस्थाला ही रक्कम दिली. या गोष्टीचा खुलासा तेव्हा झाला जेव्हा फ्रान्सच्या अ‍ॅण्टी करप्शन एजन्सीने डॅसॉल्टच्या खात्यांचं ऑडीट केलं. असं काँग्रेसने ट्विटद्वारे म्हटलं आहे.

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top