Saturday, March 06, 2021 | 12:49 AM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

अमेरिकेत हिमवादळ
18-Feb-2021 06:03 PM

   । वॉशिंग्टन । वृत्तसंस्था ।

महामारीदरम्यान 73 टक्के अमेरिकेला हिमवादळाचा तडाखा बसला आहे. लाखो लोक घरात जणू कैद आहेत. विक्रमी बर्फवृष्टी व कडाक्याच्या थंडीमुळे अनेक लसीकरण केंद्रेही बंद पडली आहेत. टेक्सास, लुइसियाना, केंटुकी व मिसौरीत 23 जणांचा मृत्यू झाला. वीजव्यवस्था कोलमडल्याने 17 राज्यांतील 43 लाख लोक अंधारात आहे. टेक्सासमधील परिस्थिती वाईट आहे. सुमारे 26 लाख लोकांना थंडीच्या काळात गैरव्यवस्थेला तोंड द्यावे लागत आहे. बर्फवृष्टीमुळे 150 हून जास्त रस्ते ठप्प झाले .1000 हून जास्त विमान उड्डाणे रद्दे झाले.आर्क्टिक येथून येणार्‍या थंडीच्या लाटेमुळे अमेरिकेतील थंडीचा गारठा वाढला आहे. टेक्सासमध्ये 10 लाख बॅरल तेल व 1000 घनमीटर गॅस वाहिन्या गोठल्याने बंद पडल्या आहेत. फेब्रुवारीत अमेरिकेचे तापमान 10 ते 14 अंशादरम्यान आहे. परंतु यंदा 122 वर्षांत पहिल्यांदाच तापमान उणे 26 अंशापर्यंत गेले. आठवड्याच्या शेवटी परिस्थितीत सुधारणा अपेक्षित आहे.

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top