आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत देशात 86 हजार 508 नवीन करोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे देशातील करोना बाधितांची संख्या 57 लाख 32 हजार 519 इतकी झाली असून, 24 तासांत 1,129 जण मृत्युमुखी पडल्यामुळे मृतांची एकूण संख्या 91 हजार 149 झाली आहे. कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंचा दर 1.59 टक्क्यांपर्यंत कमी झाला आहे.. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशात 9 लाख 66 हजार 382 जणांवर उपचार सुरु आहेत. तर कोरोना संसर्गातून बरे झालेल्यांची संख्या 46 लाख 74 हजार 988 इतकी झाली आहे. दरम्यान, आयसीएमआरने दिलेल्या माहितीनुसार देशात आतापर्यंत 6 कोटी 74 लाख 36 हजार 31 कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. तर बुधवारी 11 लाख 56 हजार 569 करोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत.

 

अवश्य वाचा

गर्भातील बाळाला दिले रक्त