अलिबाग 

भारतीय शेतकरी कामगारपक्षाचा 73 वा वर्धापन दिन नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील बहादुरपुरा येथे शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पार पडला. भाई गुरुनाथराव कुरडे व डॉ. भाई केशवराव धोंडगे यांचे निवासस्थानी हा कार्यक्रम पार पडला.

या निमित्ताने  लाल बावटा ध्वजारोहन करुन मानवंदना देण्यात आली. यावेळी भाई कुरुडे व डॉ भाई केशवराव धोंडगे यांनी ध्वजा वंदना नंतर आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी  सरपंच भाई माधवराव पेटकर उपसरपंच भाई गुरुनाथ पेटकर माजी ऊपसरपंच उत्तमराव भांगे पक्ष पक्षाचे कार्यालय सेक्रेटरी भाई इ माधवराव कदम दत्ता पाटील धोंडगे परसुराम पाटील धोंडगे गंगाराम रुमाली गुरुजी भाई बालाजी लुंगारे भाई गणपतराव पाटील पेटकर पांडुरंग करूदे गोविंद लुंगारे शेख मेहबूब शेख बंटी वाघमारे गुंड रेसर बळीराम पेठकर गणेश शिवपुजे शिवाजीराव इंदूरकर वसंतराव कुरुडे गुरुजी विनायक गव्हाणे ढगे साहेब प्रदीप बळीराम साईनाथ व गुरुनाथ राव कुरुडे आधी होते. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सर्व कार्यक्रम सोशल डिस्टंसिंग पाळून पार पडले.

 

अवश्य वाचा

राज्यभरात पावसाचा धुमाकुळ

नेरळ रेल्वे गेट 21 पासून बंद