नवी दिल्ली,

 देशात  गेल्या  24 तासात 70 हजार 589 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. यासोबत  देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णसंख्या 61 लाख 45 हजार 576 वर पोहोचली आहे. दरम्यान गेल्या 24 तासात 776 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे.

 देशात सध्याच्या घडीला 9 लाख 47 हजार 576 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंत 51 लाख 1 हजार 398 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. दरम्यान करोनामुळे आतापर्यंत देशातील 96 हजार 318 जणांचा मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्रात कोरोनामुक्त सर्वाधिक

दुसरीकडे राज्यात करोनाचा संसर्ग अद्यापही वाढत असला तरी, दुसरीकडे करोनामुक्त होणार्‍यांच्या संख्येतही वाढ होताना दिसत आहे. सोमवारी दिवसभरात आढळलेल्या करोनाबाधितांपेक्षा करोनावर मात केलेल्यांची संख्या अधिक असल्याचे समोर आलं. राज्यात सोमवारी 19 हजार 932 जणांची कोरोनावर मात केली. तर, 11 हजार 921 नवे करोनाबाधित आढळले आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट 77.71 टक्क्यांवर पोहचला आहे. 

 

अवश्य वाचा