नवी दिल्ली 

देशात कोरोना बाधितांची संख्या वाढतच असून शुक्रवारी 6 हजारांहून अधिक कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली. राज्यातही कोरोनाचा कहर सुरुच आहे. राज्यात कोरोना बाधितांची संख्या 41 हजार 642 वर पोहोचली आहे. राज्यात मुंबईत सर्वाधिक कोरोना ग्रस्तांची संख्या वाढत असून ती 25 हजार 500 वर पोहोचली आहे.

कोरोनाचे संक्रन रोखण्यासाठी सरकारच्यावतीने विविध उपायोजना हाती घेण्यात आल्या असल्यातर रुग्णांच्या संख्येत भरमसाठ वाढ होत आहे. देशात प्रती दिवशी साधारणाताः 4 हजार नव्या रुग्णांची भर पडत आहे तर राज्यात दिड ते 2 हजारांच्या सुमारास रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. रुग्ण बरे होण्याच्या संख्येतही वाढ होत आहे. हे सकारातम्क चित्र असल्याचे दिसून येत आहे.

देशात शुक्रवारी रात्री पर्यंत अंदमान आणि निकोबारमध्ये 33, आंध्र प्रदेशात 2647, अरुणाचल प्रदेशात 1, आसाम 203, बिहार 1982, चंडीगड 217, छत्तीसगड 128, दादर-नगर हवेली 1, दिल्ली 11659, गोवा 52, गुजरात 12905, हरियाणा 1031, जम्मू- काश्मीर 1449, झारखंड 290, कर्नाटक 1605, केरळ 690, लडाख 44, मध्य प्रदेश 5981, महाराष्ट्र 41642, मणिपूर 25, मेघालय 14, मिझोरम 1, ओडिशा 1103, पुडुचेरी 20, पंजाब 2028, राजस्थान 6227, तामिळनाडू 13967, उत्तराखंड 146, उत्तर प्रदेश 5515 आणि पश्‍चिम बंगालमध्ये 3197, त्रिपुरा 173, तेलंगणामध्ये 1699 आणि हिमाचल प्रदेशमध्ये 152 प्रकरणे आहेत.

अवश्य वाचा

आज पासून नवी सुरुवात!