बॉक्स ऑफिसवर कमाईचे अनेक रेकॉर्ड करणाऱ्या 'बाहुबली' या चित्रपटात व्हिलनची म्हणजेच भल्लालदेवाची भूमिका साकारणारा साऊथचा अभिनेता राणा डगुबात्ती हा ८ ऑगस्ट रोजी मिहिका बजाज सोबत लग्नबंधनात अडकणार आहे. इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्याने याबाबत माहिती दिली आहे. 

      राणाने बाहुबली, लीडर या सारख्या अनेक चित्रपटात दमदार भूमिका साकारल्या आहेत. अभिनेता होण्याआधी तो visual effect  प्रोड्युसर होता. उत्तम कामगिरीसाठी त्याला २००६ मध्ये अवॉर्ड देखील मिळाला होता. ऑनलाईन प्लँटफॉर्मवर उपलब्ध सिरीजमध्ये देखील तो आपल्याला पाहायला मिळतोय. त्याची होणारी संगिनी मिहिकाने इंटेरिअर डिसाईनिंग मध्ये मास्टर्स केले असून तिची ड्यू ड्रॉप डिसाईन स्टुडिओ नावाची कंपनी देखील आहे. २१ मे रोजी त्यांचा साखरपुढा  झाला होता आणि आता ८ ऑगस्ट रोजी हैदराबाद येथे त्यांचा विवाहसोहळा संपन्न होणार आहे. राणाचे वडील सुरेश बाबू यांच्या नुसार राणा डिसेंबर मध्ये लग्न करेल असे त्यांना वाटत होते परंतु हा निर्णय घेऊन त्याने आम्हाला खुश केले आहे असे त्यांचे म्हणणे आहे. राणाच्या सर्वच चाहत्यांना त्याच्या लग्नाची उत्सुकता लागली आहे. सर्वजण त्या क्षणाची आतुरतेने वाट आहेत.  

अवश्य वाचा