Tuesday, January 26, 2021 | 09:45 PM

संपादकीय

लोकशाहीचा आत्मा जपावा

भारतीय लोकशाहीच्या दृष्टीने तीन तारखा अत्यंत महत्त्वाच्या आहेत

अभिनेते आसिफ बसरा यांची आत्महत्या
13-Nov-2020 05:03 PM

हिमाचल

बॉलिवूड अभिनेते आसिफ बसरा यांनी आत्महत्या केली आहे. आसिफ यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यांच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

आसिफ बसरा यांचा मृतदेह हिमाचल प्रदेशमधील धर्मशाळा येथील घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडला. पोलीस या प्रकरणी चौकशी करत आहेत. मात्र आसिफ यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

अभिनेते आसिफ बसरा हे गेल्या पाच वर्षांपासून मॅक्लोडगंजमध्ये एका मैत्रिणीसोबत भाडे तत्त्वावर घेतलेल्या घरात राहत होते. त्यांची मैत्रिण परदेशी असून ते दोघे लिव्ह इन रिलेशनमध्ये राहत असल्याचे म्हटले जाते.

आसिफ हे बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय अभिनेते आहेत. त्यांनी आशिकी २, वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई, ब्लॅक फ्रायडे, काय पो चे अशा अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे.

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top