बॉलीवूडमध्ये घराणेशाहीची म्हणजेच नेपोटिझमची वावटळ उठलेली असताना अनेक स्टार किड्सना त्याचा सामना करावा लागत आहे. आलिया भट पासून सोनम कपूर पर्यंत कोणीही त्यातून वाचू शकलेले नाही. त्यात आता वर्णी लागलेली आहे दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची कन्या जान्हवी कपूर हिची. जान्हवीच्या  येणाऱ्या आगामी चित्रपटामुळे ती सोशल मीडियावर चांगलीच ट्रोल  केली जात आहे. 

जान्हवीचा 'गुंजन सक्सेना - द कारगिल गर्ल' हा कारगिल युद्धात असीम पराक्रम गाजवलेल्या गुंजन सक्सेना या  फ्लाईट असिस्टंट वर आधारित असून त्यात जान्हवी गुंजनचे पात्र साकारत आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर आला आहे. आणि तो पाहून नेटकऱ्यानी जान्हवीला पुन्हा एक्टिंग स्कूल मध्ये जाऊन एक्टिंग शिकून येण्याचा सल्ला दिला आहे. करण जोहरने प्रोड्युस केलेल्या या चित्रपटासाठी जान्हवीला अक्षय कुमार व शाहरुख खान यांनी पाठिंबा दर्शवला आहे परंतु तुम्ही सुशांत सिंग राजपूतच्या चित्रपटांच्या वेळी कुठे होतात असा सवाल नेटकऱ्यानी त्यांना विचारला आहे. टीझर पाहून जान्हवी कपूरने गुंजनच्या भूमिकेला न्याय मिळवून दिला नाही असे प्रेक्षकांचे म्हणणे आहे. तिच्या जागी इतर कोणी सामान्य घरातील मुलीला जर ही  भूमिका करायला दिली असती तर तिनेही जान्हवीपेक्षा जास्त ताकदीने ती भूमिका पेलली असती असे सर्वांचे म्हणणे आहे. एकूणच हा चित्रपट प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करतो कि नाही हे पाहणे मजेशीर ठरणार आहे. १२ ऑगस्ट रोजी  हा चित्रपट सर्वांच्या भेटीला येणार आहे. 

 

अवश्य वाचा