Tuesday, April 13, 2021 | 12:55 PM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

चक्क क्लिनरने केली चालकाची भर रस्त्यात हत्या
02-Apr-2021 08:39 PM

गडचिरोली | प्रतिनिधी

धानोरा येरकड मार्गावर सालेभट्टी गावाजवळ काही तांत्रिक बिघाडामुळे  मागिल आठवड्यापासुन ऊभ्या असलेल्या एका ट्रेलरच्या ड्राइवरची त्याच्याच सहयोगी क्लिनरर कडून आज दुपारी २ वाजताचे सुमारास चाकू भोकसुन हत्या झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ट्रेलरच्या मालकाने बऱ्याच प्रतिक्षेनंतर ड्राइवरच्या बैंक खात्यात आज  पैसे टाकले. त्या पैशांच्या मागणीच्या विवादाची परिणती हत्येत झाली. अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे. अन्नाराज एम. मारिया मिशेल रा. कालकाड (तमिलनाडू) असे मृतक ड्राइवरचे नाव असुन पोनमडसामी दशमुर्ती रा. उत्तीरामुथ्थानपत्ती ( तमिळनाडू) असे हत्या करणाऱ्या क्लिनरचे नाव समजते. 

प्राप्त माहितीनुसार सदर ट्रेलर मागिल ६ ते ७ दिवसांपासून तांत्रिक बिघाडामुळे धानोऱ्या पासुन साधारणत: ५ किमी अंतरावर असलेल्या सालेभट्टी गावाजवळ दुरूस्तीच्या प्रतिक्षेत ऊभा केलेला होता. ट्रेलरचे ड्राइवर आणि कंडक्टर दोघेही तिथेच होते. त्यांना पूढे छत्तीसगढ़ ला जायचे असल्याचे समजते. आठवडाभर एकाच ठिकाणी असल्याने त्यांचेकडील पैसेही संपले होते. त्यात आज ट्रेलरच्या मालकाने ड्राइवरच्या बैंक खात्यात १० हजार रुपये जमा केले. यातील काही पैसे कंडक्टरने मागितल्यावरून विवाद सुरू झाला आणि त्यात कंडक्टर ने ड्राइवरवर चाकूने वार करून त्याची हत्या केली. या वादात ड्राइवरच चाकू घेऊन कंडक्टरवर चालून गेला आणि यातून आत्मसंरक्षण करताना झालेल्या प्रतिक्रियेत ड्राइवरला प्राण गमवावे लागले, असे क्लिनर कडून सांगण्यात आल्याचीही माहिती प्राप्त झाली आहे.

दरम्यान पोलिसांनी घटनेची नोंद घेऊन कंडक्टर ला ताब्यात घेतले असुन ड्राइवरचे पार्थिव शवविच्छेदनासाठी धानोरा ऊपजिल्हा रूग्णालयात पाठविले आहे. पुढील चौकशी धानोरा पोलीस करीत आहेत.

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top