Monday, January 18, 2021 | 04:34 PM

संपादकीय

ड्रायव्हरलेस मेट्रोचं लक्षवेधी तंत्र!

किंबहुना, असं म्हणणार्‍यांना वेड्यात काढलं गेलं असतं.

केंद्रीय मंत्र्यांच्या गाडीला भीषण अपघात
12-Jan-2021 03:30 PM

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।

केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांच्या गाडीला भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात त्यांच्या पत्नी विजया नाईक यांचा मृत्यू झाल्याचे समजते. तर श्रीपाद नाईक यांच्यावर उपचार सुरू आहे.कर्नाटक राज्यातील अंकोला तालुक्यातील होसाकंबी गावातून प्रवास करत असताना नाईक यांच्या गाडीचा अपघात झाला. या अपघातात त्यांची गाडी पलटी झाली. यामध्ये विजया नाईक यांना गंभीर दुखापत झाली होती. रुग्णालयात दाखल करताच त्यांचा मृत्यू झाला. तर इतर तिघे किरकोळ जखमी झाले आहेत.श्रीपाद नाईक हे गोव्यातील दिग्गज नेते आहेत. दिवंगत नेते मनोहर पर्रिकर यांच्या निकटवर्तीयांपैकी एक आहेत. गोव्यातील भाजपचा एक आश्‍वासक चेहरा म्हणून श्रीपाद नाईक यांच्याकडे पाहिले जाते.

  

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top