साप्ताहिक राशी भविष्य

8/9/2020 ते 8/16/2020

मेष : आहारी जाऊ नका

चंद्र-हर्शल युतीमुळे, माणसाचे मन दुसर्‍या व्यक्तीमध्ये गुंतते त्या व्यक्तीचा पगडा इतका बसतो की, एखादा आहारी गेलेला मनुष्य, सर्वस्वाचा त्याग करायला सुद्धा मागे-पुढे पहात नाहीत. मात्र त्यातून पुढे असे प्रसंग घडत राहतात की, ज्यामुळे आपण मोठ्या नुकसानीचे बळी ठरतो. यास्तव एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल. कोणाही व्यक्तीमध्ये फार गुंतू नये. व्यवहारापुरतेच संबंध प्रस्थापित करावे. आपले स्वतःचे शारीरिक मानसिक-आर्थिक नुकसान होऊ देऊ नये. या सप्ताहात काही नवीन गोष्टींची सुरूवात होणार आहे. त्यातून आशादायक सूर निघेल. नातेवाईकांशी विचार विनिमय करून निर्णय घ्यावे. प्रापंचिक सौख्यात वाढ होईल. आर्थिक अडचण दूर होईल. आरोग्यातही सुधारणा होईल. मात्र आहार-विहारावर नियंत्रण ठेवावे. अतिश्रम टाळावे. महिलांना : भाग्यकारक घटना घडेल. प्रवासाचे बेत आखाल. प्रयत्नपूर्वक प्रकृती निकोप राखावी. शुभदिनांक : 09, 14, 15.


वृषभ : दडपणे दूर होतील

शनी-मंगळ-बुध-शुक्र या ग्रहांची साथ चांगली राहणार असल्याने जुन्या समस्या, काही प्रश्‍न संपुष्टात येणार आहेत. आर्थिक विवंचना हळू हळू कमी होतील. मात्र स्वतःवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. नोकरदारांवर वरिष्ठ खूष होतील. आपण केलेले नवीन प्रयोग यशस्वी ठरणार आहेत. व्यापारातील उलाढाली वाढणार आहेत. त्यातून मागील तुटवडा भरून निघेल. काटेकोर नियोजन, खर्चात कपात, योग्य गुंतवणूक याद्वारा आपण आदर्श व्यक्ती बनू शकता. वेळोवेळी ज्येष्ठांचे-श्रेष्ठांचे मार्गदर्शन उपयुक्त होईल. प्रपंचातील सदस्यांबरोबर साधलेला सुसंवाद व त्यांना दिलेले योग्य महत्व आपणांस सुखावेल. प्रोत्साहन मिळाल्याने सर्वांचे काम, प्रगतीपथावर राहील. आप्तेष्टही वेळोवेळी आपली विचारपूस करीत राहतील. अध्यात्मात रमल्याने प्रसन्नता लाभेल. महिलांना : उगाच विवंचना करीत न बसता कर्तव्य महत्वाचे मानावे. शुभदिनांक : 11, 12, 15.


मिथुन : बोलण्यात सुसुत्रता

ग्रहांचा प्रभाव सर्वसामान्य आहे. कार्यपद्धती नियमबद्ध ठेवावी लागेल. आपण जरूरीपेक्षा जास्त बोललात तर विचारांची साखळी तुटू शकते. गैरसमजाला वाव मिळतो. म्हणून मर्यादीत आवश्यक तेवढेच बोलावे. सरकारी नोकरीतील कर्मचार्‍यांचा कामाचा बोजा वाढणार आहे. युक्तीने तो कमी करता येईल. वेळेचे बंधन पाळावे लागले तरी कालापरत्वे त्यात शिथीलता येईल. खाजगी क्षेत्रातील व्यक्तींना योग्यतेपेक्षा अधिक मोबदला मिळेल. व्यापार्‍यांनी फार मोठी उलाढाल टाळावी. परिस्थीती विचारात घेऊन थोडी थोडी वृद्धी करावी. त्यानेच अर्थाचे प्रमाण वाढेल. छोट्या व्यवसायिकांनी नवे कसब (स्किल) आत्मसात करावे. व्यवसायात आकर्षकता आवश्यक राहील. साधन सामुग्रीप्रमाणे व्यक्तिमत्वालाही तितकेच महत्व आहे. प्रपंचातही आपले तेवढेच योगदान हवे. महिलांना : भाग्यकारक अशी घटना लवकरच घडणार आहे. अनावश्यक प्रवास टाळावा.शुभदिनांक ः 11, 12, 15.


कर्क : आक्रमक बनू नका

रवी नेपच्यूनच्या अशुभ योगात संयम बाळगणे आवश्यक आहे. वो बुराई करे । हम भलाई करे । न किसीके बदलेकी हो कामना। हे तत्व ध्यायात ठेवावी. त्यामुळे ग्रहांची उग्रता कमी होईल. नोकरदरांनी सर्वांशी समोपचाराने वागवे. काळ-वेळ ओळखूनच निर्णय घ्यावे. नेमके काय करायचे ते निश्‍चित करून, तणावमुक्त रहावे. व्यवसायिकांनी नफ्या तोट्याचे गणित करताना पुढे फायदा वाढू शकतो त्यासाठी श्रद्धा व सबुरी आवश्यक आहे हेही ध्यानात घ्यावे. मात्र धंदा-व्यवसायात बदल न करता, आहे तोच नेटाने जरुर अशा सुधारणांसह सुरू ठेवावा. याकामी धैर्याने वाटचाल सुरू ठेवावी. आर्थिक येणी वसूल होणे थोडे जिकिरीचे काम असले तरी गोडीने काम साधावे. कौटुंबिक जीवनात फटकून वागणे. शहाणपणा ठरणार नाही. प्रत्येकाला काही मते असतातच. आपण आपली प्रकृती निकोप राखावी. महिलांना : जीवनसाथी म्हणजे ज्याला साथ द्यायला हवी असा. कलाकलाने वागून त्याला समजून घ्यावे. शुभदिनांक ः 09, 13, 14.


सिंह : ग्रहांचे बळ वाढेल

गुरू युवावस्थेत शिरत असून, चंद्र भ्रमण अनुकूल झाले आहे. सिंह जातकांना ही चांगली पर्वणी आली आहे. उत्साहवर्धक अशा या काळात महत्वाची कामे उरकता येतील. कोर्ट कचेरीतील कामे निर्णयाप्रत राहतील. नित्याच्या कामकाजात सर्वांचे सहकार्य लाभणार आहे. सरकारी नोकरीत कामे सुलभ होतील. आपली कामे इतरांवर सोपवल्यास घोटाळा होऊ शकेल. व्यापार धंद्यामध्ये बरकतीचे प्रमाण वाढेल. विक्रेत्यांच्या मालाची झटपट विक्री होणार आहे. तरीसुद्धा फार मोठी गुंतवणूक करून मालाचा साठा करून नये. भागीदारीला फाटा द्यावा. केवळ कामाधंद्यातच नव्हे तर सार्वजनिक क्षेत्रात वावरतांना सतर्क रहाणे इष्ट ठरेल. सध्या तरी पुढे येणार्‍या काळाचा विचार करणे आवश्यक आहे. त्यासाठी खर्चावर नियंत्रण व योग्य ठिकाणी गुंतवणूक करावी. प्रपंचात आनंदी वातावरण ठेवावे. महिलांना ः आरोग्यासाठी सर्व त्या उपाय योजना कराव्या. शुभदिनांक : 18, 13, 14.


कन्या : सोयी सुविधा वाढतील

अनिष्ट ग्रहांचा परिणाम थांबला आहे. आता सकारात्मक विचार करायला हवा. नोकरी-व्यवसायातील कामाकडे अधिक लक्ष देता येईल. सहकारी वर्ग खूप राहील. जुने वादविवाद संघर्ष काही काळ आपण अडचणींना तोंड देत होतात. आता मात्र आपल्याला सर्व बाजूनी अनुकूलता निर्माण झाल्यामुळे सोयी सुविधा वाढणार आहेत. बढती (प्रमोशन) अधिकारवाढ यांनी सुखावाल. आर्थिक दर्जाही उंचावत जाईल. व्यापारातील आपण वापरलेले कौशल्य योग्य मोबदला देऊन जाईल. नवीन प्रयोग यशस्वी ठरतील. समाधानाचे वारे वाहू लागतील. प्रपंचातील सदस्य आनंदात राहतील. आपणावरील त्यांची श्रद्धा वृद्धिंगत होईल. प्रवृत्ती ठीक राहील. त्यासाठी समतोल राखावा. महिलांना : ज्येष्ठ श्रेष्ठ तथा वृद्ध यांची सेवा करावी लागेल. त्यांचे आशीर्वाद मोलाचे ठरतील. शुभदिनांक : 11, 12, 15.


तूळ : सुस्थितीकडे वाटचाल

वक्री गुरूचा प्रभाव, शुक्राचे सहकार्य चंद्राचे अनुकूल भ्रमण आपल्याकडे सौख्यदायक घटना घडविणार आहेत. आपले बुद्धिकौशल्य दाखविण्यासाठी हा सप्ताह आपल्या सुकार्याची वाट पाहत आहे. यास्तव आपण ज्या क्षेत्रात कार्यरत आहात, तेथे उत्कृष्ट काम करून वाहवा मिळवता येईल. जोडीला काही नोकरी वा व्यवसायिक फायदे सुद्धा लाभू शकतात. व्यापार धंद्यात केलेल्या गुंतवणूकीचा पुरेपूर परतावा आता प्राप्त होईल. प्रपंचासह सामाजिक ठिकाणी तथा अन्य सर्वच ठिकाणी आपणाला समाधान मिळेल. आता आपण अनेक अडचणी संपवणार आहात. ज्येष्ठ-श्रेष्ठ चरिष्ट यांची कृपा व आर्शिवाद फलदायी होतील. मात्र काल अनुकूल असला म्हणजे लोक विनाकारण इकडे तिकडे ढवळाढवळ करतात. ते मात्र प्रयत्नपूर्वक टाळायलाच हवे. महिलांना ः मानसिक शक्तीतून शारीरिक शक्तीसुद्धा वाढविता येते.हे आपण सप्रमाण सिद्ध कराल. शुभदिनांक : 11, 12, 15.


वृश्चिक : भीती कमी होईल

साडेसाती संपून काही काळ लोटल्यानंतर देखील, अ निष्ट शुक्र-राहू यांच्यामुळे एक दडपणात्मक निर्माण झालेली भीती,गुरू-मंगळ यांच्या अंशात्मक शुभयोगामुळे कमी कमी होत नाहिशी होईल. त्याचबरोबर शुभ घटनांचे सुद्धा संकेत मिळत राहतील. नवीन नोकरीची संधी आहे. त्या नोकरीत स्थिरत्व, काहींना बढती मिळेल. एकंदरीत आर्थिक बाबतीत वाढ होत जाईल. व्यवसायामध्ये अचानक प्राप्त झालेले काम, नवीन कस्टमर्स, व्यापारानिमित्त प्रवास होणार आहे. मागील काळात आपण चिकाटी सोडली नाही, तशीच पुढेही चालू ठेवावी. सर्व कालावधीत योग्य नियोजन केल्याने मोठी प्रगती होईल. या सर्व गडबडीत कौटुंबिक जीवन विस्कळीत होऊन चालणार नाही. त्यांच्या सौख्यातच आपले सुख आहे. या सप्ताहात प्रतिकार शक्ती वाढेल. प्रकृतीही चांगली साथ देईल. महिलांना ः आपली जीवनशैली एक आदर्श राहणार आहे. आपण त्यामुळे आदरास प्राप्त व्हाल.शुभदिनांक ः 10, 13, 14.


धनु : अप्रिय सत्य बोलू नये

ग्रहांचा विचार करता काः प्रमाणात दुषित वातावरण आहे. ते अधिक दुषित न होऊ देता, निवळू देणे चांगले. लक्षात ठेवावे, शब्द हे शस्त्र आहे त्याने मने दुखावतात. म्हणून समाजात वावरतांना, जे सत्य असेल व अन्य लोकांना प्रिय असेल तर जरूर बोलावे मात्र अप्रिय असे सत्य बोलू नये हा संकेत पाळण्यास हा सप्ताह सुखाचा राहील. हाच न्याय आरोग्यासाठही आहे. आरोग्य विघातक गोष्टींनी प्रक्रती बिघडवून घेणे अहितकारक नित्य कर्म सरळ मार्गाने करीत राहिल्यास अर्थोदय होईल. उद्योग व्यवसायात कोणाचे ऐकून बदल नको आहे. त्यात मेहनत वाढवावी. नोकरी असो वा व्यापार-धंदा सर्वांशी सामोपचार हवा. गृहयोजनाही ममतेच्या वातावरणाचीच पाहिजे. आदर दिल्यासच आदर-सन्मान मिळतो. हे सूत्र अंगिकारले पाहिजे. अट्टाहास सोडावा. महिलांना ः आपण मुळातच मायाळू असल्याने त्रासदायक असे काही घडणार नाही.. शुभदिनांक : 09, 13, 14.


मकर : मनःशक्ती वाढवावी

सप्ताहाची सुरूवात मनात काहीतरी कुणकुण होत होणार आहे .ती काढून टाकण्यासाठी स्वतःच मनोबल वाढवावे. यापूर्वीची कमतरता मनाला त्रस्त करीत असली तरी, ध्यानधारणा, विधायक कामात गुतून राहणे, थोडे परोपकार, स्वतःच्या फायद्यासाठीच वाढीव काम करणे हितावह होईल. मागचा विचार सोडावा. गतं न शोच्च्म्। (घडलेल्या घटनेचे दुःख करू नये) यामुळेच आपण प्रगती करू शकणार आहात. धाडसानेच ध्येय गाठता येते. मात्र अन्य व्यक्तींना दिलेली आश्‍वासने अगोदर पूर्ण करावी. त्यासाठी येणार्‍या तांत्रिक अडचणी दूर कराव्या. यातून फायदा कमी झाला तरी चालेल परंतु नुकसान नको. नोकरदारांना डोक्यावरील ओझे उतरल्याने हलके वाटेल. काही बदल स्वीकारले तर कामे झटपट होतील. आर्थिक कुवत वाढेल. प्रपंचात आनंदी वातावरण निर्माण होईल. महिलांना ः धावपळीत कुटुंब सदस्यांसाठी वेळ मिळत नाही. आता मात्र मिळू लागेल. शुभदिनांक ः 11, 12, 15.


कुंभ : द्या धडक बिनदिक्कत

साडेसातीतून सावरायचे असेल तर, प्रत्येक काम बेधडक करावे, उगाच भिती बाळगून कपाळावर हात ठेवून बसण्यात काय ... आहे. चल उचल हत्यार। गड्या होऊन हुशार। तुला नव्या युगाची आण । या काव्यपंक्ती काहीतरी धडपड करा. या नव्या युगात यश हमखास. हेच तंत्र उराशी बाळगावे. काळ कसाही असो. हिमतीने तो सुखकर करता येतो. नैराश्य नष्ट होते. मिळकत वाढत जाते. नोकरदारानी इमाने, इतबार,े अधिकाधिक काम केे तर आज नाही उद्या त्याचा परतावा मिळेल. भगवानके घरमे देर है। लेकिन अंधेर नहीं है। याची जाणीव ठेवावी. आर्थिक गुंतवणूक करतांना मात्र सावधान रहावे. जिथे वृद्धी आहे व संरक्षणही अशा सरकारी बाँडमध्ये (सुवर्णरोख्यामध्ये) गुंतवावे. याकामी कोणाचीही मध्यस्ती स्वीकारू नये. तेथे धेाका असेल. प्रपंचाकडेही योग्य लक्ष पुरवावे. महिलांना हात फिरे तिथे लक्ष्मी फिरे। या सुत्राप्रमाणे गृह सजावट करावी. शुभदिनांक ः 11, 12, 15.


मीन : उत्साहातील श्रावण

ग्रह तर आपल्यावर खुष आहेत. निसर्गही आपली किमया दाखवीत आपल्याला हषित करत आहे. हा उत्साह-आनंद कायम टिकून रहावा, यासाठी आपणच तजवीन करायची असते. ती आपण करालच यात कोणतीही शंका नाही. कर्तव्याबरोबर धार्मिक गोष्टींचाही आस्वाद घेता येणार आहे. मात्र काम दुर्लक्षून नाही. पहले काम। बाद मे राम। हे ध्यानी ठेवावे लागणार आहे. सणासुदीच्या दिवसात उधळपट्टी फार होते. त्यावर नियंत्रण हवेच. माणसाने नेहमी पुढील पंचवीस वर्षाचा आढावा घेऊन खर्च करावा. नोकरी एके नोकरी हे तत्व आता मागे पडले आता सोबत काहीतीर व्यवसायही सुरू करावा म्हणजे उत्पन्नात खंड पडणार नाही. प्रपंच सदस्यांना आपल्या व्यवसायात सामिल करून घ्यायला हवे. सर्वांचे सहजीवन। आणील आनंद घन। सर्वांना योग्य तो सन्मान देत राहिल्याने त्यांचाही उत्साह वाढत राहील. .महिलांना ः सामाजिक कार्यातील आपला सहभाग कौतुकास्पद राहील. एखादे उच्चपद मिळेल. शुभदिनांक ः 09, 13, 14.

अवश्य वाचा

आणखी वाचा

फरमानशेठ दफेदार यांचे निधन