जेएनपीटी

पावसाळा लांबल्याने भातशेतीला व रब्बी हंगामातील ( वाल, चवळी, मूंग ) पीकांना ही त्यांचा फटका बसला.परंतु सध्या दोन चार दिवसांपासून हवेत गारवा वाढल्याने वाल,चवळी व मुंगाचे पिक मोठ्या प्रमाणात बहरले असल्याने शेतकरी सुखावला आहे.
   

उरण तालुक्यातील चिरनेर, कळंबुसरे,कोप्रोली परिसरातील शेतकरी भातशेतीला जोडधंदा म्हणून रब्बी हंगामातील वाल चवळी व मुंग या पिकाची लागवड आपल्या शेतात करतात.यावर्षी पावसाळा लांबल्याने भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नूकसान झाले.त्यात डिसेंबर महिन्यात हवेतील गारव्याने पाठ फिरवल्याने शेतकर्‍यांनी आपल्या शेतात घेतलेल्या रब्बी पिकावर त्याचा परिणाम होतो की काय अशा भितीने या परिसरातील शेतकर्‍यांना ग्रासले.

परंतु 2020 वर्ष उजाडते तोच हवेतील गारव्याच्या प्रमाणात वाढ झाली.हवेत निर्माण झालेला गारवा हा वाल,चवळी व मुंग या पिकाला फायदेशीर ठरत असल्याने वालांची शेती बहरली आहे.त्यामुळे वालाच्या पोपटीचा हंगाम हा जानेवारी महिन्यात सुरू होणार अशी चर्चा शेतकर्‍यांमध्ये वर्तविण्यात येत आहे.यासंदर्भात शेती निष्ठ शेतकरी हसुराम मोकल यांनी सांगितले की यावर्षी सतत पडणार्‍या पावसामूळे भाताच्या उत्पन्नात घट झाली आहे.परंतू अशा प्रकारे थंडीचा कडाका कायम राहीला तर निश्‍चितच यावेळी वाल,चवळी व मुंगाच्या उत्पादनात वाढ होईल, सध्या पावट्याच्या शेंगा बाजारात उपलब्ध झाल्याने पावट्याच्या शेंगांची पोपटी सुरू आहे.परंतु वालाच्या पोपटीचा स्वाद सुगंध वेगलाच आहे.त्यामुळे सर्वच जन वालाच्या शेंगांची आतुरतेने वाट पाहत आहेत.

अवश्य वाचा

रो- रो सेवा महागडी

रायगडातील कवींचा सन्मान.