पेण

धरमतर खाडी पूर्व किनारपटटीच्या वडखल वावे ते भाल पर्यत सुमारे 29 गावे व बेडी असून येथील धरमतर खाडी शेतकरी संघटना सोमवार दिनांक 6 जानेवारी रोजी प्राणकार्यालय पेण येथे 1 दिवसाचा लाकशनिक उपोषण करणार आहेत.
वडखळ पासून भाल पर्यतच्या सुमारे 29 गावातील 4,500  कुटुंब जे.एस.डब्ल्यु च्या माल वाहु जहाजान मुळे बाधित होत आहे.या जहाजानच्या वाहतुकीमुळे शेतकर्‍यांच मोठया प्रमाणात नुकसान होत आहे.कारण 3,200 ते 10,000 टनाच्या अजत्र मालवाहून बोटीन मुळे खाडीचा बाहय काठा तुटुन खारे पाणी शेतीत घुसत आहे.त्यामुळे शेती नापिक होण्याच्या मार्गावर आहे.जे.एस.डब्ल्यु कंपनी कडून बाहय काठयाचे काम योग्य प्रकारे होणे गरजेच आहे.परंतु ते काम योग्य प्रकारे होत नसल्याने भरतीच्या वेळी मालवाहतुक जहाजे जेव्हा समुद्रातून खाडीत घुसतात त्या वेळी बाहय काठें फुटलेले असल्याने पाणी वेगाने जमिनित शिरतो त्या मुळे जमिन खारफुटी होत चाललेली आहे शेतीतील उत्पनााच प्रमाण घटत चाललेल आहे.तसेच धरमतर खाडी मध्ये कंपनी कडून ड्रेझिंग केल्याने शेकडो खारफुटी ची झाड नष्ट झालेली आहेत या झांडान मध्ये पूर्वी माश्याची पंयदास होत असत परंतू झाडच नष्ट झाल्याने मत्स्य उत्पादन कमी होत चाललेला आहे जिताडया सारख्या लाखो रुपये उत्पन्न देणार्‍या माश्याची जातच नष्ट होत चालेली आहे.एकणदरीत जे.एस.डब्ल्यु कंपनी माल वाहतूक जहाजान मुळे खाडी लगतच्या 4,500 कुटुंब्यानवर उपासमारीची वेळ आलेली आहे.भविष्यात जे.एस.डब्ल्यु कंपनीकडून होणार्‍या त्रासावर तोडगा निघावा म्हणून धरमतर खाडी किनारपटटी शेतकरी संघटनेने 1 दिवसाचा लाक्षणिक उपोषण करण्याच निर्णय घेतला आहे. तक्रारदाराकडडे 50 हजारांची केली.

अवश्य वाचा

रो- रो सेवा महागडी

रायगडातील कवींचा सन्मान.