माणगाव

माणगाव तालुक्यातील सुमारे सातशे नऊ हेक्टर क्षेत्र आंबा बागायतीचे आहे. रायगड जिल्ह्यातील आंबा बागायतीचे उत्पादन देणारे क्षेत्र नऊ हजार सातशे पंचाहत्तर हेक्टर आहे. सध्या आंबा पिकावर फुलोरा येणे सुरु आहे, तर काही ठिकाणी मोहर आला आहे. तर काही ठिकाणी लहान-लहान आंबे लागले आहेत. मात्र, मोठया प्रमणात सध्या मोहर लागला असून, गेली काही दिवसापासून होणार्‍या सततच्या हवामानातील व वातावरणातील बदलामुळे आंबा पिकावर मावा व धुक्यामुळे बुरशी पडू लागली आहे. मावा किडीमुळे रोग फैलावतो. त्या रोगामुळे फुलोरा कोमेजून जातो. तर भुरी रोगामुळे आंबा काळवंडला जात आहे.

या रोगाशी सामना करण्यासाठी शेतकरी कृषीतज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली कीटकनाशक औषधे फवारणीसाठी कामाला लागला आहे. याबात माणगाव कृषी अधिकारी यांच्याकडे संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, या बदलत्या वातावरणामुळे कीडरोग पडण्याची शक्यता आहे. आंबापीक नुकसानीच्या भरपाईची बागायतदार शेतकर्‍यांनी वाट न पहाता मोहराचे संरक्षण करण्यासाठी औषधांची फवारणी करावी  असे आवाहन हि केले आहे. तसेच शेतकरी, बागायतदारांनी आंबा मोहर संरक्षणासाठी कीटनाशकाची पहिली फवारणी मोहर येण्यापूर्वी खोड, फांदया व शेंडयावर सायपर मेथ्रीन पंचवीस टक्के प्रवाही किंवा फेनव्हलरेट वीस टक्के प्रवाही किंवा डेकमेथ्रीन दोन टक्के प्रवाही अशी फवारणी पावसाळ्यानंतर खोडावर फांदयावर व पानावर बसेल अशा रीतीने संपूर्ण झाडावर करावी.

तसेच कीटकनाशकाची दुसरी फवारणी मोहर फुटत असताना खोड, फांदया व शेंडयावर व्कीनॉलफॉस पंचवीस टक्के प्रवाही वीस मि.ली पाण्यात मिसळून औषधाची फवारणी करावी. या फवारणीसोबत पाण्यात मिसळणारे गंधक वीस ग्राम कार्बेन्डझिम मिसळावे. यामुळे भुरी करपा रोगाचे नियंत्रण होईल. कीटनाशकाची तिसरी फवारणी दुसर्‍या फवारणीनंतर सुमारे दोन आठवडयांनी मोहर फुलण्यापूर्वी झमीडक्लोप्रिड सतरा टक्के तीन मिली पाण्यात मिसळून तिसर्‍या-चौथ्या फवारणीसाठी कीटकनाशकाच्या द्रवणामध्ये आवश्यकतेनुसार भुरी रोग नियंत्रणासाठी वीस ग्राम पाण्यात मिसळणारे गंधक किंवा दहा ग्राम कार्बेन्डझिम किंवा पाच मिली हेक्झकोनझोल मिसळावे. या कीटकनाशक औषधाचा वापर करण्यासाठी अधिक माहितीसाठी संबंधित संबंधित कृषी अधिकारी तसेच कृषी तज्ज्ञांकडे संपर्क करावा असे आवाहन केले आहे.

अवश्य वाचा

तळोजातील घराला आग