महाबळेश्वर

     येरुणकर उत्कर्ष मंडळाच्या वतीने ज्ञानज्योत (शैक्षणिक) उपक्रम-२०१९ सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील येरणे व एरंडल गावातील रा.जि.प शाळेमध्ये संपन्न झाला ज्ञानज्योत (शैक्षणिक) उपक्रमाच्या अंतर्गत वह्या व शैक्षणिक साहित्य वाटपाचे काम करण्यात आले.या कार्यक्रमामध्ये संपुर्ण महाराष्ट्रातील घाडगे-येरुणकर कुटुंबातील सभासद व येरणे व एरंडल गावातील ग्रामस्थ, शिक्षकवर्ग व विद्यार्थी सामिल होते येरुणकर उत्कर्ष मंडळ शैक्षणिक, सामाजिक,सांस्कृतिक क्षेत्रात काम करत आहे त्याअनुषंघाने मंडळाने शैक्षणिक क्षेत्रात काम करण्याचे ठरवले आहे त्यानुसार मंडळाच्या माध्यमातुन ग्रामीण भागातील मराठी शाळांमध्ये शैक्षणिक साहीत्य वाटण्याचे काम गेली कित्येक वर्षे करत आले आहे.

आपण ह्या समाजाचे काहीतरी देणे लागतो आणि ह्या समाजासाठी आपण काहीतरी केले पाहीजे,मदतीचा सदैव पुढे केला पाहीजे त्याच अनुषंगाने शैक्षणिक क्षेत्रातील कार्य मंडळाच्या वतीने ह्यापुढेही करण्यात येतील असे मंडळाच्या वतीने सांगण्यात आले सदर कार्यक्रमाला मंडळाचे लहान थोर वरिष्ठ मंडळी तसेच येरणे व एरंडल गावचे ग्रामस्थ मंडळ,शिक्षक वर्ग,अदी मंडळी उपस्थित होते.

अवश्य वाचा

मुरूड - अलिबाग बस नादुरुस्त...