१५ डिसेंबर २०१९

     ३१ ऑक्टोम्बर २००५ नंतर शासन सेवेत नियुक्त सर्व कर्मचाऱयांना महाराष्ट्र नागरी सेवा अधिनियम १९८२ व १९८४ ची पेन्शन पूर्ववत लागू करणेसाठी विधिमंडळाच्या अधिवेशनात चर्चा व्हावी आणि पाठपुरावा होणेसाठी म्हसळा तालुका प्राथमिक शिक्षक संघटनेकडून आम.आदितीताई तटकरे यांच्याकडे लेखी निवेदन देण्यात आले.२००५ नंतर सेवानिवृत्त झालेल्या शासकीय कर्मच्यार्याना आयुष्यभर सेवा करूनही कर्मच्याऱयांना निवृत्ती वेतन मिळणार नसल्याने सेवानिवृत्ती नंतर म्हातारपणी जीवन कसे जगावे,आमच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येणार असल्याचे निवेदनात नमूद केले असून या मागण्यांसाठी अधिवेशनात न्याय मागणीसाठी हा प्रश्न उपस्थित करून आपल्या मागण्या मंजूर करून घेण्यासाठी मी निश्चितपणे प्रयत्न करीन असे आश्वासन आम.आदिती तटकरे यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिले.या प्रसंगी शिक्षक संघटनेचे अध्यक्ष नितीन माळीपरगे,समीर बनकर,मोरे,किशोर जैन,पंकज गुप्ता,लहूशेठ म्हात्रे,हेमंत पयेर,शाहिद उकये आदि मान्यवर उपस्थित.

अवश्य वाचा