चिपळूण 

      पंचायत समिती सभापती पूजा शेखर निकम व उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोत्ती अभियान आयोजित पापड-पीठ-चटण्या महोत्सव २०१९ या कार्यक्रमाचे उद्घाटन सभापती पूजा निकम यांच्या हस्ते व चिपळूणचे उपविभागीय अधिकारी प्रवीण पवार , नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ वैभव विधाते यांच्या प्रमुख उपस्थितीत अण्णासाहेब खेडेकर संकुलांबाहेर उभारण्यात आलेल्या मंडपांमध्ये  संपन्न झाले. दिनांक १४ आणि १५ डिसेंबर रोजी या उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाला दोन दिवस भरघोस प्रतिसाद मिळाला. 

        यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष मिलिंद कापडी, सभापती पूजा शेखर निकम, राष्ट्रवादी महिला तालुकाध्यक्ष जागृती शिंदे, माजी शहराध्यक्ष सुचय रेडीज, सतीशअप्पा खेडेकर, नगरसेविका फिरोजा मोडक, जि प सदस्या दिशा दाभोळकर, माजी नगराध्यक्षा सावित्री होमकळस ,रिहाना बिजले, राष्ट्रवादी शहराध्यक्ष दीपमाला नाटुस्कर, माजी नगरसेविका सीमाताई चाळके, युवती अध्यक्षा स्मिता जानवलकर, राष्ट्रवादी सोशल मीडिया चिपळूण शहराध्यक्ष अक्षय केदारी, महिला बालकल्याण सभापती शिवानी पवार, बांधकाम सभापती बिलाल पालकर आदी मान्यवर उपस्थित होते. या महोत्सवामध्ये एकूण ३७ बचत गटांनी आपल्या विविध कोकणी पदार्थांचे स्टॉल आयोजित केले होते. यामध्ये बारा प्रकारचे पापड ,आठ ते दहा प्रकारचे मसाले, विविध लोणची, उपवासाचे पदार्थ, आंबा फणस काजू यांचे पदार्थ ,तसेच स्नॅक्स पदार्थ, घरगुती केलेली विविध पीठ,मिरच्या,गावठी भाज्या याठिकाणी उपलब्ध करण्यात आले होते. या सर्व घरगुती आणि ग्रामीण भागातील उत्पादनांना चिपळूणवासियांनी उत्तम प्रतिसाद दिला. महिलांना उत्तम बाजारपेठ मिळावी या उद्देशाने सभापती पूजा निकम दरवर्षी या महोत्सवाचे आयोजन करतात. यामुळेच या महोत्सवातील काही महिलांना तसेच महिला बचत गटांना मोठ्या बाजारपेठेमध्ये आपली उत्पादन विकण्यासाठी संधी देखील मिळाली आहे. सभापती पूजा निकम यांच्या उपक्रमाचे या महोत्सवाचे ठिकाणी भेट देणारे अनेक नागरिक आणि मान्यवरांनी कौतुक केले.

अवश्य वाचा