बोर्ली प़चतन 

        केंद्र व राज्य शासनाने ग्रामपंचायती सक्षम होण्यासाठी ग्रामसभेला व्यापक अधिकार दिले आहेत.ग्रामपंचायत हा स्थानिक स्वराज्य व्यवस्थेचा पाया आहे. शासनाने टप्प्याटप्प्याने ग्रामपंचायतींना व्यापक अधिकार देऊन त्या सक्षम करण्यासाठी प्रयत्न केले आहेत.बहुतांशी विकास योजनांच्या मंजुरीचे अधिकार ग्रामसभांना दिले आहेत.त्यानुसार श्रीवर्धन तालुक्यातील शिस्ते-कापोली गृप ग्रामपंचायतची ग्रामसभा शुक्रवार दि.१३ डिसेंबर रोजी खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.

 पंधराव्या वित्त आयोगच्या पंचवार्षिक आराखड्यातुन ग्रामपंचायत हद्दीतील अनेक प्रलंबीत व नवीन विकास कामासंदर्भात ग्रामसेभेमधे चर्चा करुन सिमेंट कॉक्रीटचे रस्ते, आवश्यक तेथे पाणि निचऱ्यासाठी मोऱ्या तसेच अनुचित जाती जमाती,मागासवर्गीय,विधवा, अपंग,आरोग्य,शिक्षण,उपजीविका अंगणवाडी,मराठी शाळा,बचत गट, आरोग्य शिबिर यासंबधीत असणाऱ्या  योजनांवर व ग्रामस्थांकडुन आलेल्या सुचनांनुसार योग्य ती चर्चा करुन शिस्ते कापोली गावच्या विकास कामांना मंजुरी देण्यात आली.सदर ग्रामसभेला सरपंच चंद्रकांत चाळके,उपसरपंच सौ.अमीशा परशुराम भायदे,ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक अभय पाटील,कापोली अध्यक्ष परशूराम पाटील,पाणि पुरवठा अध्यक्ष परशुराम भायदे, विजय कांबळे, नाना मोहिते (अध्यक्ष शिस्ते गाव)  योगेश धुमाळ,.  संजय पाटील.  गजानन चालक्के, व शिस्ते कापोली ग्रामस्थ मंडळ बहुसंखेने उपस्थीत होते.

अवश्य वाचा