महाड-दि.१५ डिसेंबर

युथ क्लब महाड आणि रायगड जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने दि.२९ डिसेंबर २०१९ रोजी किल्ले रायगड प्रदक्षिणेचे आयोजन सालाबाद प्रमाणे करण्यांत आले आहे.रायगड प्रदक्षिणा उपक्रमाचा या वर्षी २८ वर्षे पुर्ण होत असुन दरवर्षी रायगड प्रदक्षिणा कार्यक्रमाला संपुर्ण राज्यांतुन चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे युथ क्लब महाडचे अध्यक्ष संजय मेहता यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.

महाड मधील हॉटेल दावत मध्ये आयोजित करण्यांत आलेल्या पत्रकार परिषदेला डॉ.चंद्रशेखर दाभाडकर,युथ हॉस्टेचे अध्यक्ष संजय मेहता,सदस्य श्रीमती दिपा धारप,डॉ.समिर बुटाला,अशोक तलाठी,राजेश बुटाला,उरय पयेलकर आदी उपपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही एक पुजनीय तसेच ऐतिहासिक वास्तु आहे, आपण ज्याला पुज्यनिय मानतो,त्याला प्रदक्षिणा घालणे ही भारतीय संस्कृती आहे.या संस्कृतीला अनुसरुन सालाबाद प्रमाणे यावर्षी रविवार दि.२९ डिसेंबर २०१९ रोजी युथ क्लब महाड आणि रायगड जिल्हा परिषदेच्या सहायाने राज्यस्तरीय रायगड प्रदक्षिणा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यांत आले आहे.या कार्यक्रमा मध्ये राज्यांतील गड प्रेमी,शिवप्रेमी त्याच बरोबर आबालवृध्दांनी जास्तीतजास्त संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन पदक्षिणा कार्यक्रमाचे आयोजन डॉ.चंद्रशेखर दाभाडकर म्हणाले.या वर्षी रायगड प्रदक्षिणेच्या पुर्वसंध्येला शनिवारी रात्री प्रख्यात गिर्यारोहक श्रीमती शिल्पा परब यांचे ‘रायगड किल्ल्याचे शास्त्रीय अवलोकन ’ या विषयावर पाचाड येथे व्याख्यान आयोजित करण्यांत आले आहे तर प्रदक्षिणाथ्र्या करीता ‘पर्यावरण छायाचित्र स्पर्धा’( अटी व शर्थी लागु) केली आहे.

रायगड प्रदक्षिणेची अधिक माहिती,अटी आणि शर्थी  युथ हॉस्टेलचे अध्यक्ष संजय मेहता सांगताना म्हणाले,प्रदक्षिणा सकाळी ६ वाजता रायगडाच्या पायथ्या पासुन सुरवात करण्यांत येईल,या प्रदक्षिणा कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी ५० वर्षा वरील प्रदक्षिणार्थीना शारिरीक तंदुरुस्तीचे प्रमाणपत्र आवश्यक आहे,प्रदक्षिणार्थीना पाचाड पर्यत जेण्या जाण्याचा प्रवास खर्च स्वत:चा स्वत: करावा लागेल,मुघ्क्कामास येणाNया साठी राहाण्याची व्यवस्था धर्मशाळेमध्ये विना मुल्य करण्यांत येईल.१० वर्षा खालील मुला-मुलींना पालकां बरोबर प्रवेश देण्यांत येईल,अपरिहार्य कारणा मुळे कार्यक्रमा मध्ये पेâरफारकरण्याचा अंतीम अधिकार आयोजकांचा राहील.प्रदक्षिणा विषयी अधिक महिती करीता युथ हॉस्टेल महाडचे अध्यक्ष संजय मेहता -९४२२४९४९७६,श्रीमती दिपा धारप-९९६७०५७६३७,श्रीमती श्रध्दा जोशी – ९८५०४५८५७४,श्रीमती माधुरी मोहिते (खोपोली)९९७५८००४९५,श्रीमती शर्वरी सकपाळ (डोंबिवली)९४२१२६०१२७ यांच्याशी संपर्वâ साधावा  असे आवाहन संयोजकां कडून करण्यांत आले आहे.

अवश्य वाचा