महाड-दि.१५ डिसेंबर 

म्हाप्रळ पंढरपुर या राज मार्गाचे रुंदीकरण कामाला सुरवात करण्यांत आली असुन त्या साठी भुसंपादन प्रक्रीया करण्यांत आली नसल्याने जमीन मालक असलेल्या शेतकNयांनी रस्त्याच्या रुंदीकरण कामाला हरकत घेतली आहे.शासनाने शेतकNयांच्या जमीनी रस्ता रुंदीकरणा करीता घेतल्या परंतु संमती घेतली नसल्याने मोबदला देखिल देण्यांत आलेला नाही.महाड उपविभागीय अधिकारी यांना सादर केलेल्या निवेदना मध्ये मोबदल्याची मागणी करण्यांत आली असुन तातडीने जमीन संपादन प्रक्रीया पुर्ण करावी आणि जमीनीचा मोबदला देण्यांत यावा अन्यथा तीव्र आदोलन सुरु करण्याचा इशारा बेबलघर,वराठी या गावांतील ग्रामस्थांसह सामाजिक कार्यकर्ते सुनिल गोठल यांनी दिला आहे.

महाड तालुक्यांतील खाडी विभागांतुन जाणारा राजमार्ग क्रमांक १५ हा या विभागांतुन महाड,वरंध,माझेरी भोर मार्गे पंढरपुरला जातो.या मार्गाचे रुदीकरणाचे काम सुरु असुन राजेवाडी ते भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्मगाव असलेल्या आंबडवे या गावा पर्यत होत आहे.सुमारे६० किलो मिटर लांबीच्या या रस्त्याचे काम नॅशनल हायवे विभागा कडून करण्यांत येत आहे.नव्याने तयार करण्यांत आलेल्या या महामार्गाला ९६५ डि.डि. या नावाने संबोधित करण्यांत येणार आहे.सध्या सुरु करण्यांत आलेले रस्ता रुंदीकरणाचे काम नॅशनल हायवे विभागा कडून करण्यांत येत असुन हा रस्ता दुपदरी करण्यांत येत आहे.सदरचे काम एम.बी.पाटील वंâपनीला देण्यांत आले असल्याची माहिती देण्यांत आली.रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामाला एक वर्षा पुर्वी सुरवात करण्यांत आली,त्या पुर्वी नॅशनल हायवे विभागाने महाड महसुल विभागाला भुसंपादन तातडीने करुन देण्यांत यावे अशी विनंती केली होती परंतु अद्याप भुसपांदन करण्यांत आले नाही,मात्र रुंदीकरणाच्या कामाला सुरवात करण्यांत आली,त्या साठी शेतकNयांच्या जमीनीमध्ये खोदकाम देखिल करण्यांत आले.त्या मुळे शेतकNयां मध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात असुन जमीनीचा मोबदला त्वरीत मिळावा अशी मागणी शेतकNयांनी केली आहे.

म्हाप्रळ पंढरपुर हा राजमार्ग महाड तालुक्यांतील राजेवाडी गावा पासुन शिरगाव, सव, चोचिंदे , रावढळ, तुडील, तेलंगे, चिंभावे,वराठी या गावां मधुन थेट रत्नागिरी जिल्ह्याला जोडण्यांत आला आहे.तालुक्यांतील गोमेडी,चिंभावे,वराठी पंचक्रोशीतील गांवातुन जाणाNया रस्त्याचे किती रुंदीकरण करण्यांत येत आहे आणि हा मार्ग कोणत्या गावांतुन जाणार आहे याची कांहीच कल्पना स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांना देण्यांत आलेली नाही.येथील प्रांताधिकारी यांना देण्यांत आलेल्या निवेदना मध्ये या बाबतचा उल्लेख करण्यांत आलेला आहे.तरीही अद्याप शेतकNयांना भुसंपादन करण्याची कोणतीच नोटीस बजावण्यांत आलेली नाही.या परिसरांतील कांही गावांतील शेतकNयांच्या खाजगी जमीनींतुन देखिल विना परवाना खोदकाम करण्यांत आले असल्याने शेतीचे देखिल प्रचंड नुकसान झाले असल्याचे निवेदना मध्ये म्हटले आहे.कांही जमीनीमध्ये आंब्याची,सागाची झाले होती ती देखिल तोडण्यांत आली असुन त्या बाबत वन विभागाला देखिल कळविण्यांत आले नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.या बाबत प्रशानाने दखल घ्यावी अशी मागणी करण्यांत आली आहे.त्याच बरोबर रस्त्याच्या कामा मध्ये किती जमीन संपादीत करण्यांत येणार आहे या जमीनीचा मोबदला किती देण्यांत येणार आहे यावी सविस्तर माहिती शेतकNयांना देण्यांत यावी,पुर्व कल्पना न देता जमीनी ताब्यांत घेतल्या जात असल्याने शेतकNयांचे म्हणणे आहे.

म्हाप्रळ पंढरपुर रस्त्याच्या रुंदीकरणा कामाला आमचा विरोध नाही,परंतु आमच्या जमीनी ताब्यांत घेताना प्रशासनाने पुर्व सुचना देणे आवश्यक आहे,गेल्या कांही दिवसा पासुन खोदकाम वेगाने केले जात असल्याने सदरचे काम थांबविण्यांत यावे आणि शेतकNयांना न्याय मिळवुन द्यावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.महाड येथील नॅशनल हायवे विभागाचे शाखा अभियंता अमोल महाडकर यांच्याशी संपर्वâ साधला असता,येथील प्रांताधिकारी कार्यालयाला भुसंपादन करण्या विषयी कळविण्यांत आले आहे,ज्यांच्या जमीनी संपादीत होत आहेत त्यांना योग्य मोबदला देण्यांत येणार असल्याची माहिती महाडकर यांनी दिली.

अवश्य वाचा