उरण

    उपविभागीय अधिकारी (प्रांत) यांच्याकडे तत्कालीन तहसिल कल्पना गोडे यांच्यावर रीतसर चौकशी करून अभिलेखाची पडताळणी आणि तातडीने कारवाई करण्यासाठी लेखीपत्र येऊनही गेली सहा महिन्याचा अवधी उलटूनही कोणतीच कारवाई होताना दिसत नाही. त्याचा निषेध करण्यासाठी उरण सामाजिक संस्थेतर्फे आज सोमवार दि. १६ डिसेंबर रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत उपविभागीय (प्रांत) अधिकारी यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

    तत्कालीन तहसिलदार कल्पना गोडे यांनी गैरमार्गाने सातबारा उताऱ्यावर एका ट्रस्टचे नावे असलेली मौजे म्हातवली व चाणजे उरण येथील २० एकर जमीन गैरमार्गाने मिळालेल्या वारस वारस दाखल्याची आधारे व प्रशासकीय नियमांचा भंग करून दुसऱ्याच्या नावे केली. त्याविरोधात २९-३-२०१९ रोजी निवेदनाद्वारे मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य यांच्याकडे तक्रार केली होती. त्यावर जिल्हाधिकारी यांनी सदरहू  तक्रार अर्जानुसार उपविभागीय (प्रांत) अधिकारी यांच्याकडे रीतसर चौकशीसाठी पाठविण्यात आला होता. त्याला आता ६ महिन्याचा अवधी उलटूनही कोणतीच कारवाई झालेली नाही.

    शासकीय अधिकारी वर्गाकडून कोणतीच कारवाई होत नाही, यावरून तत्कालीन तहसिलदार गोडे यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्याचा निषेध करण्यासाठी आज सोमवार दि. १६ डिसेंबर रोजी उपविभागीय(प्रांत) कार्यालयासमोर सकाळी ११ ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत  एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती उरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुधाकर पाटील यांनी दिली.

अवश्य वाचा

रो- रो सेवा महागडी

रायगडातील कवींचा सन्मान.