नेरळ,ता.15

                                 पर्यटकांचं आवडत पर्यटन असलेल्या माथेरान मध्ये वाहनास बंदी,प्रदूषण मुक्त हवा यामुळे माथेरान जगभरात प्रसिद्ध आहे.पण यावर्षी जोरदार कोसळलेल्या पावसामुळे माथेरानची पर्यटक संख्या रोडावली होती त्यात मिनिट्रेन बंद असल्यामुळे मिनिट्रेनच्या चाहता वर्गाने माथेरान कडे पाठ फिरवली होती.मात्र तब्बल सहा महिन्यानंतर माथेरान मध्ये पर्यटक दाखल झाल्यामुळे संपूर्ण माथेरान फुलले असून येथील व्यावसायिक,हॉटेल व व्यापारी वर्गाने समाधान व्यक्त केले आहे.

                                आषाढ महिन्यात पर्यटक मोठ्या प्रमाणात दाखल झाले होते.त्यानंतर माथेरानला उतरती कळा लागली होती.पण प्रदूषण मुक्त माथेरान असल्यामुळे अन्य पर्यटनस्थळापेक्षा येथे शुद्ध हवा,थंडगार आल्हाददायक वातावरण आणि दोन दिवसापासून पडलेली थंडी यामुळे पर्यटकांनी मुंबई-पुण्याच्या अगदी जवळचे पर्यटनस्थळ असलेल्या माथेरानला पहिली पसंती दिली आहे.14 जानेवारी म्हणजे शनिवारी माथेरान मध्ये 5254  पर्यटक दाखल झाले आहेत.त्यामुळे सहा महिन्यानंतर पर्यटकांची मांदियाळी पाहवयास मिळाल्याने सर्व खाद्यान्न गृह फुल्ल होते तर काही ठिकाणी पर्यटकाना वाट पाहावी लागली.

माथेरान मध्ये सहा महिन्यानंतर प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल झाले आहेत.त्यामुळे आमच्या व्यापारी वर्गात आनंदाचे वातावरण असून पर्यटकाना चांगल्या सुविधा देत आहोत असे राजेश चौधरी,अध्यक्ष माथेरान व्यापारी फेडरेशन यांनी स्पष्ठ केले. 

अवश्य वाचा