उरण 

   आधीच विविध प्रकल्पामध्ये होणाऱ्या कित्येक अपघाती प्रकरणाच्या निमित्ताने उरण तालुक्यातील आपत्ती व्यवस्थापन सुविधा कुचकामी ठरल्याचे यापूर्वीच स्पष्ट झालेले असतानाच येथील आय ओ टी एल सारख्या प्रकल्पासाठी फायर वॉटर म्हणून चक्क काही ठिकाणच्या डबक्यात साचलेले पाणी सर्रासपणे नेले जात असल्याची सनासनाटी माहिती हाती आली आहे . हे पाणी सोनारी करळ येथील एका डबक्यातून भरून ते आय ओ टी एल च्या करीता फायर वर्क विभागासाठी पुरविले जात असल्याची सनसनाटी माहिती हाती आली आहे . याबाबत आय ओ टी एल चे संदीप पाटील यांना विचारणा करण्या करता त्यांना फोन केला असता फोन उचलला गेला नाही त्यामुळे व्हॅटस अप मेसेज पाठवून विचारणा केली असता त्यांनी व्हॉट्स अप मेसेज वाचूनही कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही त्यांचे आणखी एक अधिकारी पांडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी असे आमच्या प्रकल्पात होत नाही आमच्याकडे पाण्याचे टेस्ट रिपोर्ट असल्याचे  सांगितले मात्र टेस्ट रिपोर्ट जे पाणी आपल्याला पुरविले जाते आहे त्याचेच कशावरून याबाबत मात्र काहीही बोलण्यास नकार दिला आहे . 

           भाराभर प्रकल्पाचा तालुका म्हणून ओळख असलेल्या उरण तालुक्याने यापूर्वी अनेक अपघात अनुभवले आहेत . आणि यापैकी आगीसारख्या अनेक अपघातांमध्ये प्रकल्पांकडे साधे फायर वॉटर नसल्याने अग्निशमन दलाला आजूबाजूचे गावकीचे तलाव , साठवण तलाव , किंवा मासेमारी तलावांतून किंवा अगदी तीन चार किमीचे अंतर जाऊन एखाद्या गावाच्या मोठ्या तालावांतून पाण्याचा उपसा करण्याची वेळ आल्याचे आपत्ती विभागाने पाहिले आहे.एवढे झाल्यावरही आजही अनेक प्रकल्पांमध्ये पाण्याचे मात्र दुर्भिक्षच असल्याचे दिसत आहे. ओ एन जी सी सारख्या प्रकल्पाला आग लागली त्यावेळी त्या ठिकाणी पुरेशा प्रमाणात फोम नसल्याची बाब समोर आली होती . अनेकदा अशा आगीमध्ये काही प्रकल्पामध्ये मनुष्य हानी देखील झाली असल्याचे अनेकदा उघड झाले आहे. मात्र त्यानंतर ही तालुक्याचे प्रशासन कोणताही धडा घ्यायला तयार नसल्याचे दिसत असून तालुक्यातील अत्यंत ज्वालाग्राही पदार्थ साठविल्या जाणाऱ्या धुतूम जवळील आय ओ टी एल प्रकल्पासाठी  फायर वॉटर्स चा पुरावठा करणारे टँकर चक्क सोनारी करळ जवळील एका डबक्यातून भरले जात असल्याचे समोर आले आहे . हे टँकर आय ओ टी एल साठीच पाणी पुरवठा करीत असल्याची माहीती टँकर वरील ड्रायव्हर लोकांनी दिली आहे तर आय ओ टि एल च्या व्यवस्थापनातील फायर वॉटर विभाग सांभाळणारे अधिकारी मात्र आमच्या पाण्याचे टेस्ट रिपोर्ट आमच्याकडे उपलब्ध असल्याचे सांगताना टेस्ट रिपोर्ट नक्की कोणत्या पाण्याचे याचा मात्र खुलासा करू शकलेले नाहीत त्यामुळे चिखलयुक्त पाणी उद्या एखाद्या अपघाताच्या वेळी फायर सिस्टीममध्ये अडकले आणि फायर सिस्टम बंद पडली तर त्याला जबाबदार कोण असा सवाल दीपक भोईर नामक सामान्य नागरिकाने बोलताना व्यक्त केला आहे.

अवश्य वाचा