उरण

 रयत शक्षण संस्थेचे,तु.ह.वाजेकर उच्च माध्यमिक विद्यालय फुंडे येथे मंगळवार  दि.10  डिसेंबर 2019 रोजी ‘रायगड विभागीय गायन स्पर्धा’ अतिशय उत्साहात संपन्न झाल्या.

आपला भारत देश म्हणजे विविध कलावंतांची खाण आहे.विविध मातब्बर संगीत गायकांनी आपल्या सुरेल आवाजाने संपूर्ण जगभरात नावलौकिक मिळविला आहे.विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी रयत शिक्षण संस्था सातारा,कर्मवीर विद्याप्रबोधिनी संचालित - रायगड विभागीय गायन स्पर्धेचे दरवर्षी आयोजन करण्यात येते.सदर  स्पर्धा फुंडे हायस्कूल येथे आयोजित करण्यात आली होती.रायगड विभागाचे विभागीय अधिकारी श्री.संजय मोहिते,विद्यालयाचे प्राचार्य श्री.मोहन पाटील, उपमुख्याध्यापक श्री.ए.यू.खाडे,पर्यवेक्षक सौ.आशा मांडवकर, श्री.जी.सी.गोडगे,श्री.व्ही.के.कुटे,श्री.एस.एम.बल्लाळ,श्री. एस.एन.गुजर,श्री.के.के.म्हात्रे आदी मान्यवरांच्या शुभहस्ते प्रतिमापूजन आणि दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.

 फुंडे विद्यालयातील मुलींनी गोड आवाजात रयत गीत व स्वागत गीत सादर केले.,विद्यालयाचे प्राचार्य श्री.मोहन पाटील, यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून स्पर्धक विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. तर रायगड विभागीय अधिकारी श्री.संजय मोहिते यांनीही उपस्थित स्पर्धक विद्यार्थी आणि रयत सेवकांचे स्वागत करून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. या गायन स्पर्धेसाठी संपूर्ण रायगड विभागातील विविध शाखांतील एकूण 100 विद्यार्थी सहभागी झाले होते.

  गट क्र.1 - इ.5 वी ते 7 वी -, गट क्र.2 - इ.8 वी ते 10 वी, गट क्र.3 - इ 11 वी ते 12 वी अशा तीन गटांमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली. सर्व स्पर्धक विद्यार्थ्यांनी आपल्या गोड आवाजात अभंग,भक्तीगीत,भावगीत अशा सुंदर गीतांचा नजराणा पेश  केला. सदर स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून गावंड एस.आर, पाटील एच.एन., प्राजक्ता म्हात्रे यांनी अतिशय निरपेक्षपणे परीक्षण केले. या स्पर्धेत उलवा,वावंजे, पोलादपूर, नावडे, वाशी, फुंडे,पारगाव  येथील विद्यार्थ्यानी यश संपादन केले. एकूण तीन गटांमध्ये फुंडे शाखेतील चार विद्यार्थ्यांनी बक्षिसे मिळविली. विजयी स्पर्धकांना बक्षिस समारंभात मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक व रोख रकमेचे पारितोषिक देवून गौरविण्यात आले. विद्यालयातील सर्व सेवक वृंदानी या कार्यक्रमाचे छान नियोजन करून ही स्पर्धा यशस्वीपणे संपन्न केली.

अवश्य वाचा