बोर्ली मांडला

 अलिबाग तालुक्यतील रेवदंडा पोलीस स्टेशन अंतर्गत बोर्ली औट पोस्टच्या हद्दीत नेपाळमधून मामाने भाचीस फूस लावून आणल्याप्रकरणी पीडित मुलीचे पिता (सुखड जिल्हा कैलाली देश नेपाळ )यांनी रेवदंडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

याबाबतचे वृत्त असे की,रेवदंडा पोलीस ठाणे हद्दीत दिनांक 30/11/2019 रोजी 00:00 वा ते दि. 02/12/2019 रोजी 00:00 वा. सुमारास फिर्यादी रा.सुखड जिल्हा कैलाली देश नेपाळ यांची मुलगी वय-16 व आरोपी रा.सुखड जिल्हा कैलाली देश नेपाळ हे नात्याने मामा भाची असुन आरोपी यास सदरची पिडीत मुलगी ही 16 वर्षाची बालिका आहे हे माहित असुन सुध्दा तिला नेपाळ वरून भारतात फुस लावुन आणुन तिच्याशी वेळोवेळी शारिरीक संबध केले. सदर गुन्ह्यातील आरोपीस दिनांक 10/12/2019 रोजी 17.32 वा. सुमारास अटक करण्यात आली आहे.

याबाबत रेवदंडा पोलीस ठाणे येथे गुरनं 105/2019 भा.दं.वि.क. 363,376 बाल लै. अत्या.संरक्षण (POCSO) अधिनियम 2012 चे कलम 4 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोनी श्री.जैतापुरकर हे करीत आहे.

अवश्य वाचा