खांब-रोहे,दि.११

      अध्यात्माचा वसा लाभलेल्या मालसई गावांमध्ये दि.६ डिसें.ते दि.९ डिसें.या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे अखंड पारायण आदी धार्मिक कार्यक्रमाची मोठ्या भक्तीभावाने यशस्वी सांगता करण्यात आली.

         वै.श्री संत अलिबागकर बाबा महाराज यांच्या कृपाआशीर्वादाने ,वै.ह.भ.प.गुरुवर्य गोपाळ बाबा वाजे,कै.ह.भ.प.धोंडू महाराज कोल्हटकर यांच्या कृपाछत्राखाली ह.भ.प.गुरुवर्य श्री .नारायण महाराज वाजे मठाधिपती पंढरपूर यांचे मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या या सप्ताहातअखंड पहाटे काकड आरती,श्री ज्ञानेश्वरीचे सामुदायिक पारायण,प्रवचन,हरिपाठ,किर्तन,जागर,भजन तसेच मोक्षदा एकादशी व गीता जयंतीच्या निमित्ताने आपला धर्मग्रंथ श्रीमद् भगवत गीतेचे पारायण करण्यात आले .

       अखंड हरिनाम सप्तहात ह.भ.प.नारायण महाराज वाजे पंढरपूर ,ह.भ.प.सुरेश महाराज पालवणकर,ह.भ.प.नित्यानंद महाराज मांडवकर,पुरुषोत्तम महाराज पाटील  आणि ह.भ.प.सखाराम महाराज निकम ह्या नामवंत किर्तनकारांची किर्तनसेवा लाभली. तर ह.भ.प.दिनेश महाराज कडव यांच्या काल्याच्या किर्तनाने सप्ताहाची सांगता झाली .

  तसेच मोठ्या भक्तिभावाने आणि आनंदाने पालखी सोहळाही संपन्न झाला .गावांतील अबालवृद्धांनी देहभान विसरून हरिनामाच्या जयघोषावर ठेका धरला.सप्ताह कालखंडात गावाचे रुपच पालटून गेले. ग्रामस्थांच्या एकोप्याचे दर्शन घडले.

     ह्या कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी मोठ्या संख्येने वारकरी व परिसरातील नागरिक उपस्थित होते .कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रामस्थ मंडळ ,महिला मंडळ ,युवक मंडळ मालसई यांनी प्रचंड मेहनत घेतली .आगामी येणाऱ्या पंचक्रोशी सप्ताहासाठी आपण सज्ज असल्याचे संकेत मालसई ग्रामस्थांनी आपल्या कृतीतून  दिले आहेत .

अवश्य वाचा

रो- रो सेवा महागडी

रायगडातील कवींचा सन्मान.