चिपळूण 

सह्याद्री शिक्षण संस्था सावर्डे संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सावर्डे विद्यालयाच्या चार खेळाडूंची विभागीय फिल्ड आर्चरी स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. शनिवार दिनांक ७ डिसेंबर २०१९ रोजी डेरवण क्रीडासंकुल येथे क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे आणि जिल्हा क्रीडा कार्यालय रत्नागिरी यांच्यावतीने घेण्यात आलेल्या शालेय जिल्हास्तरीय फिल्ड आर्चरी स्पर्धेत विद्यालयातील इयत्ता नववी मधील सेजल चव्हाण दहावी मधील रोहित चव्हाण व प्रदीप गुरव आणि इयत्ता अकरावी मधील मृणाल सकपाळ या विद्यार्थ्यांनी इंडियन, रिकव्हर व कंपाऊंड या इवेंटमध्ये सहभाग घेतला होता या चारही खेळाडूंनी  उत्कृष्ट खेळी करत आपापल्या इव्हेंटमध्ये प्रथम क्रमांक पटकावला. आणि त्यांची वारणानगर जिल्हा कोल्हापूर येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. या खेळाडूंना राष्ट्रीय धनुर्विद्या कोच ओमकार घाडगे तसेच विद्यालयाचे क्रीडा शिक्षक उदयराज कळंबे सहाय्यक अमृत कडगावे ,रोहित गमरे यांचे मार्गदर्शन लाभले त्यांच्या या यशाबद्दल चिपळूण संगमेश्वरचे नवनिर्वाचित आमदार आणि संस्थेचे कार्याध्यक्ष माननीय शेखरजी निकम ,संस्थेचे सेक्रेटरी मा.अशोक विचारे, संस्थेचे ज्येष्ठ संचालक व शालेय समितीचे चेअरमन मा.शांताराम खानविलकर विद्यालयाचे मुख्याध्यापक मा.अन्वर मोडक पर्यवेक्षक मा. उद्धव तोडकर ज्येष्ठ शिक्षक विजय काटे यांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

अवश्य वाचा