११ डिसेंबर २०१९

"राज्यात सर्वत्र विकास आघाडी असतानाही म्हसळा तालुक्यातील खरसई ग्रामपंचायत सरपंच पदाच्या झालेल्या निवडणुकीत शेकाप-राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडी कडून शिवसेनेच्या विरोधात उमेदवार उभा केला आणि शिवसेनेला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले.निवडणूक निकालानंतर आमचे म्हसळा प्रतिनिधी यांनी आघाडीचे विजयी उमेदवार शेकाप चे नवनिर्वाचित सरपंच निलेश मांदाडकर यांची घेयलेली मुलाखत.  प्रश्न:-१

१) राज्यात विकास आघाडीत शेकाप असताना शिवसेनेच्या विरोधात निवडणूक लढवण्याचा निर्णय कसा घेतला?

उत्तर:-राज्यात विकास आघाडीत शेकाप असला तरी स्थानिक पातळीवर विकासाच्या मुद्द्यावर शिवसेना पक्षाविरोधात निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला मागील  निवडणुकीत सेनेला गावातून भरघोस यश मिळाले मात्र विकास  कामे करण्यात त्यांना अपयश आल्याने जनतेने गावातून मला पाठींबा दिला.त्याच प्रमाणे पोट निवडणूक सर्व पक्ष एकत्र येऊन बिन विरोध करण्यासाठी माझ्यासह गावातील कार्यकर्त्यांनी  प्रयत्न केला मात्र याला सेनेच्या स्थानिक नेत्याने खो घातल्याने ना एलाजने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला.त्यात निर्विवाद यश मिळाले.

२) भविष्यात या निर्णयाबद्दल काय परिणाम होऊ शकतो? 

उत्तर:-

२) या निर्णयाचा कोणताही परिणाम होईल असे वाटत नाही कारण राज्यात विकास आघाडी असली तरी अनेक महानगरपालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये या आघाडीचा कोणताही परिणाम झालेला दिसून येत नाही. जिल्ह्यातील अनेक तालुक्यात आघाडीतील घटक पक्ष एकमेकांसमोर उभे राहिले त्यामुळे भविष्यातील राजकारण हे प्रत्येक पक्षाच्या अस्तित्वाच्या दिशेने सुरू राहील.

अवश्य वाचा

रो- रो सेवा महागडी

रायगडातील कवींचा सन्मान.