खांब-रोहे,दि.११

         रोहे तालुक्यातील जिवनधारा सामाजिक संस्था वरसगाव-कोलाड यांच्या वतीने किशोरवयीन मुली व स्रियांच्या आरोग्यासाठी कार्यशाळा यशस्वीपणे संपन्न करण्यात आली.

           जीवनधारा सामाजिक संस्था वरसगाव कोलाड यांच्या वतीने नेहमीच सामाजिक बांधिलकी जपत अशाप्रकारचे वैविध्यपूर्ण कार्यक्रम संपन्न केले जातात. त्याच अनुषंगाने किशोरवयीन मुली व महिलांसाठी मासिक पाळी व आरोग्य या विषयावर  कार्यशाळा मुंबई मधील मैना फाऊण्डेशन यांच्या वतीने नडवली आदिवासीवाडी व द.ग.तटकरे माध्य. विद्यालय कोलाड येथे सदरचा कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न करण्यात आला.या कार्यशाळेत मैना फाऊण्डेशनच्या सदस्या डॉ. श्रद्धा जाधव व डॉ. अर्चना काळे यांनी महत्वपूर्ण मार्गदर्शन केले.या कार्यशाळेत एकूण १५० महिला व तरूणीने सहभाग नोंदविला होता.त्यांच्या अनेक शंका व समस्यांचे निराकरण तज्ज्ञ डॉक्टरांकडून करण्यात आले.तर कार्यशाळेत मासिकपाळी कालावधीत मुली व त्रिया यांनी घ्यावयाची काळजी व आरोग्य याबाबत तसेच आपल्या शरीराची वाढ कशी होते,आपली मानसिकता,परिस्थितीनुसार आपले विचार वागणे कसे बदलतात याबाबतही माग्रदर्शन करण्यात आले.

         या कार्यक्रमाचे नियोजन मुंबई येथील  निर्मला निकेतन सोशल वर्कर्स च्या विद्यार्थ्यांनी काजोल,स्नेहल,हिमामी व आशा यांनी अँड.हिल्डा फर्णाडिस यांच्या मार्गदर्शनाखाली केले.

अवश्य वाचा