मुंबई, ११ डिसेंबर २०१९ 

एज्युकेशन वर्ल्ड यांनी सेंटर फॉर फोरकास्टिंग ॲन्ड रिसर्च प्रा.लि. या बाजारपेठ संशोधन आणि अभिप्राय मतदान संस्थेच्या सहयोगाने, त्यांच्या ९ व्या वार्षिक एज्युकेशन वर्ल्ड इंडिया प्रिस्कूल रॅंकिंग्ज २०१९-२० सर्वेक्षणाच्या माध्यमातून देशभरात १६ शहरे आणि सर्वात लहान मुलांसाठी असणार्‍या ६६२ प्रिस्कूल्सच्या श्रेयांकनाचे परिणाम घोषित केले आहेत. देशभरातील सर्वात प्रशंसित शाळातील सर्वात उतम प्रथांवर ठळक प्रकाशझोत टाकते. बसंत मॉन्टेसरी स्कूल - चेंबूर, कांगारू किडड्स, युरो किडड्स, पोद्दार जम्बो किडड्स, गरोडिया प्रीस्कुल, किडझी, मिलेंनीयम स्टार किड्स, सनफ्लॉवर प्लेस्कुल, घोषाला एमपीएस स्कुल, अंगणवाडी क्र ९७, साईनाथ नगर बालवाडी, अंगणवाडी क्र ९८, अशा प्रकारच्या अनेक मुंबई ठाणे येथील ६६२ प्रीस्कुल आणि अंगणवाडींचा सर्वेक्षणामध्ये समावेश होता.             

असमान तुलना टाळण्यासाठी, चार महानगरे आणि १२ शहरातील एकल स्वामित्व संचालित (proprietary) आणि फ्रॅन्चाइज्ड (Franchised) प्रिस्कूल्स (प्रिप्रायमरी/प्रि-प्राथमिक) संस्थांचे वेगळे श्रेयांकन करण्यात आले. या व्यतिरिक्त, इतर शासन संचालित प्राथमिक शाळांसाठी आदर्श म्हणून प्रस्तुत करण्याच्या हेतूने मुंबई, दिल्ली आणि बंगळूरु मधील सर्वात उत्तम प्रकारे संचालित अंगणवाड्यांचे दुसर्‍यांदा सर्वेक्षण करण्यात आले.

भारतातील सर्वोत्कृष्ट प्रिस्कूल्सचे ९वे अवबोधन आधारित (परसेप्च्युअल) सर्वेक्षण दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता, बंगळुरू, हैदराबाद, पुणे, अहमदाबाद, गुरुग्राम, नोएडा, भुवनेश्वर, चंदिगड, गाझियाबाद, भोपाळ, जयपूर आणि कोच्चि या सहा शहरांत करण्यात आले. शंभराहून अधिक सी-फोर कार्यक्षेत्र संशोधकांनी एकूण ८४९७ एसइसी (सोशियो-एकॉनॉमिक/सामाजिक-आर्थिक) स्तरातील, प्रि-प्रायमरी क्षेत्रात असणार्‍या व कमीत कमी एक मूल प्रिस्कूलमध्ये शिकणाऱ्या ’ए’ स्तराचे पालक आणि शिक्षक व मुख्याध्यापकांच्या मुलाखती घेतल्या.

श्री दिलीप ठाकोर, बिझिनेसइंडिया आणि बिझिनेसवर्ल्डचे माजी संस्थापक-संपादक आणि एज्युकेशनवर्ल्ड (स्थापना 1999) सद्य प्रकाशक-संपादक म्हणतात, “अर्थशास्त्र नोबेल पुरस्कार विजेते डॉ. जेम्स हेकमन यांच्या संशोधनाने सिध्द केले आहे की वैयक्तिक शिक्षण प्रवासात सर्वात प्रांरंभिक वर्षे अत्यंत महत्त्वाची असतात. इडब्ल्यू इंडिया प्रिस्कूल श्रेण्यांकन २०१९-२०, हे देशभरातील सर्वात प्रशंसित शाळातील सर्वात उतम प्रथांवर ठळक प्रकाशझोत टाकते. प्रारंभिक बालसंगोपन व शिक्षणासाठी तरुण पालक आणि प्रत्यक्षात वापर करणाऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त माहिती सर्व मापदंडांना समान महत्त्व देण्यात आले आहे.”

 

 

अवश्य वाचा