नेरळ,ता.11

              देशभरात महिला मुलींवर अत्याचाराच्या घटनांनी थैमान माजवलंय. या घटना ऐकल्या कि मेंदूला अक्षरशः झिणझिण्या येतात. तर ज्यांच्यावर हे बितलंय त्यांचा विचार केलं तरी मन सुन्न होत. खरंच आज आपल्या आजूबाजूला असलेल्या महिला सुरक्षित आहे का ? असा प्रश्न निर्माण होत असताना कर्जत तालुक्यातून या यापुढे कोणतीही मुलगी महिला निर्भया,प्रियांका होऊ नये यासाठी चळवळ उभी राहत आहे. यातून कोणतीही महिला रात्री अपरात्री अडचणीत असेल तर बिनदिक्कत फोन करा. तुमचा भाऊ तुमच्या मदतीला तयार आहे असे सांगण्यात येत आहे.त्यासाठी कर्जत तालुक्यातील राजकीय पक्ष आणि कार्यकर्ते यांनी सोशल मीडियावर मदत करणाऱ्या पोस्ट टाकून महाविद्यालय मध्ये शिकणाऱ्या मुली आणि नोकरी करणाऱ्या तरुणी यांना मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.

               कोपर्डी, कठुवा, उन्नाव, निर्भया तर आता प्रियांका रेड्डी हत्याकांड. देशभरात महिलांवरील निर्दयी, घृणास्पद, माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या घटना ऐकल्या कि मन सुन्न पडते. या घटनांमुळे एक प्रश्न कायम अनुत्तरित राहतो आजच्या महिला सुरक्षित आहेत का ? 21 च्या शतकातील महिला या पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून गरुडभरारी घेत आहे. आजच्या आधुनिक क्षेत्रात स्त्री कुठेच मागे नाही. मात्र आजची स्त्री किती सुरक्षित आहे हा प्रश्न वरील घटना ऐकल्या कि आपसूकच पुढे येतो. नुकत्याच हैदराबाद येथे प्रियांका रेड्डी बाबत झालेल्या प्रकारचा विचार करता संबंध देश हळहळला. मात्र यापुढे कुठेही प्रियांका, निर्भया होऊ नये म्हणून कर्जत तालुक्यातून एक चळवळ उभी राहत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून महिला मुलींना धीर देण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामध्ये स्वतःचे नाव, पत्ता, व मोबाईल क्रमांक टाकून म्हंटले आहे कि परिसरात कोणतीही माझी बहीण, जर प्रवासादरम्यान स्वतःला असुरक्षित समजत असेल किना कोणत्या अडचणीला सामोरे जाण्याची शक्यता असेल तर त्यांनी कधीही फोन करावा आणि सांगावे कि भाऊ मला तुझी मदत हवी आहे. तसेच हा मॅसेज प्रत्येकाने त्याच्या नाव आणि मोबाईल क्रमांकाने पुढे पाठवावा. 

            मध्यंतरी जय हो नामक एक असाच सिनेमा आला होता. तायतही एकाने मदत करून पुढे पाच जणांना मदत करण्याचे आवाहन केले जाते. सुरवातीला अश्याक्ष वाटणारी हि गोष्ट नंतर सगळीकडे पसरते. त्यातून एक साखळी निर्माण होते. त्याचपद्धतीने छत्रपती  शिवरायांचा वारसा लाभलेल्या या तालुक्यातून उभे राहिलेले हे अभियान संपूर्ण देशभर पसरून त्यातून महिलांची सुरक्षितता करण्यासाठी असंख्य मावळे उभे राहतील. अशी आशा व्यक्त केली जात आहे.

 

अवश्य वाचा