कोर्लई, ता.११

न्यायदानात तालुक्याचा दुवा असलेले मुरुड चे कोर्ट कोणतीही पुर्व कल्पना अगर नोटीस न देता  दि.९ डिसेंबर पासून रजेवर गेल्याने वकील- पक्षकारांना दाव्यांची सुनावणी व निकाल न्याय मिळण्यात विलंब होण्याची शक्यता निर्माण झाली असल्याने नाराजीचा सुर दिसून येतो आहे.

यापूर्वी देखील माहे मार्च २०१९ ते आँगष्ट २०१९ या सहा महिन्याच्या कालावधीत मुरुड कोर्ट असेच रजेवर गेले होते.मुरुड कोर्टातील न्यायाधीश रजेवर असताना त्यांच्या जागी दुसरे न्यायाधीशांची नेमणूक होणे गरजेचे असल्याचे बोलले जाते असून सद्यस्थितीत मुरुड कोर्टाचे प्रभारी (इनचार्ज) कोर्ट हे अलिबाग येथे नेमून दिलेले असल्याने मुरुड कोर्टातील काम चालविणे करीता वकील व पक्षकारांना नाईलाजाने अलिबाग येथील इन्चार्ज न्यायालयात न्याय मागण्या करीता जाणे बंधनकारक झालेले असून शाररिक व मानसिक त्रास सहन करावा लागणार असून आर्थिक भुर्दंडही बसणार आहे.त्यामुळे न्यायधिश रजेवर असताना मुरुड कोर्टातच पर्यायी न्यायधिश व न्यायदानाची व्यवस्था करावी. अशी मागणी जोर धरू लागली आहे.

अवश्य वाचा