नेरळ,ता. 11 

मध्य रेल्वेच्या कर्जत एन्ड कडील नेरळ या जंक्शन रेल्वे स्थानकात असलेले नामफलक दिसेनासे झाले आहेत. माथेरान या पर्यटन स्थळी जाण्यासाठी नेरळ रेल्वे स्थानकात उतरावे लागते. मात्र नव्याने नेरळ रेल्वे स्थानकात आलॆल्या प्रवाशांना हेच का नेरळ रेल्वे स्थानक असे विचारले जात आहे. 

नेरळ या मध्य रेल्वे वरील महत्वाच्या जंक्शन स्थानकात नव्याने प्रवास करणारे प्रवासी उतरल्यानंतर त्यांना शेजारच्या प्रवाशाला हे नेरळ स्थानक आहे काय?कारण नेरळ स्थानकात असलेले विविध बोर्ड वर सध्या स्थानकाचे कोणतेही नाव नाही. ते सर्व बोर्ड पिवळे रंग लावून कोरे करकरीत बनविले गेले आहेत. त्यामुळे सध्या त्या बोर्डांवर कोणत्याही प्रकारची माहिती नाही. दुसरीकडे प्रवाशी आणि पर्यटक यांच्यासह शालेय विद्यार्थी देखील आपल्या अभ्यासक्रमातील माहिती साठी स्थानकात गेल्यानंतर नेरळ रेल्वे स्थानक हे नाव,मराठी,हिंदी,किंवा इंग्रजी अशा कोणत्याही भाषेत नाही. त्याचवेळी त्या स्थानकात नेरळ समुद्रसपाटी पासून किती उंचीचे आहे याची देखील माहिती असते. ती माहिती काही विद्यार्थ्यांना गरजेची असते. त्यावेळी पर्यटक हे माथेरान ला जाण्यासाठी नेरळ स्थानकातून येत असतात. त्यांना देखील बिना नावाच्या पार्ट्यांमुळे गोंधळात पडावे लागते. 

पर्यटकांनी याबाबत नेरळ प्रवासी संघटना यांच्याकडे अनेकांनी नेरळ स्थानकातील बोर्ड बद्दल तक्रारी केल्या आहेत. स्थानकाला असलेले सर्व चार बोर्ड हे संस्ध्या कोणत्याही नाव आणि अन्य माहिती न लिहिलेले आहेत. त्याचमुळे आता तात्काळ त्या सर्व बोर्डावर नावे लिहिण्याची मागणी नेरळ प्रवासी संघटनेचे राजेश गायकवाड यांनी केली आहे. 

अवश्य वाचा