जेएनपीटी दि ११ 

उरण तालुक्यातील मोठे भोम या गावातील नामदेव पाटील या सर्व सामान्य कुटुंबात जन्म घेतलेल्या राजेश पाटील यांनी सुमारे ४ हजार विविध जातींच्या सरपटणाऱ्या प्राण्याना जिवदान देण्याचे काम केले आहे.तसेच सर्पदंश झालेल्या नागरिकांना स्वखर्चाने नवीमुंबई सारख्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करून जिवदान देण्याचे महान कार्य केले आहे.त्यांच्या या कार्याची दखल साई देवस्थानचे अध्यक्ष रविशेठ पाटील यांनी घेऊन साई सन्मान हा महत्त्वाचा पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.

राजेश पाटील यांना वयाच्या सोळाव्या वर्षी पुथ्वी तळावर वावरणाऱ्या सरपटणाऱ्या प्राण्याबद्दल स्नेहाचा, जिवाळ्याचा ओढा निर्माण झाला.आणि त्या ओढ्यातून राजेश पाटील यांनी उरण, नवीमुंबई परिसरातील लोकवस्तीत वावरणाऱ्या विविध जातींच्या सरपटणाऱ्या प्राण्याना पकडून सुरळीत ठिकाणी सोडण्याचे काम केले आहे.तसेच ज्या नागरीकांना सरपटणाऱ्या प्राण्यानी दंश केला.त्याना तात्काळ नवीमुंबई परिसरातील रुग्णालयात स्वखर्चाने नेण्याचे काम केले.तसेच त्यांचे प्राण वाचविण्यासाठी वैद्यकीय अधिकारी, रुग्णालयातील डॉक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न केले आहेत.

राजेश पाटील याना या संदर्भात विचारणा केली असता त्यांनी सांगितले की पुथ्वीचा समतोल राखण्यासाठी या तळावर सर्वांना वारण्याचा अधिकार आहे.सरपटणारे प्राणी विशेष करुन साप हे विनाकारण कोणाला दंश करत नाहीत.उलट ते शेतकऱ्यांचे मित्र आहेत.त्यामूळे विविध जातींच्या सरपटणाऱ्या प्राण्याना कोणी मारू नये.ज्या ज्या वस्तीत, परिसरात सरपटणारे प्राणी वावरत आहेत.त्याना पकडून सुरळीत ठिकाणी सोडण्याचे काम आम्ही करत असतो.आज जवळजवळ ४ हजारच्या वर  विविध जातींच्या सरपटणाऱ्या प्राण्याना जिवदान देण्याचे काम केले आहे.आणि भविष्यात हि हे काम करणार आहे.तरी शेतकऱ्यांचा मित्र असणाऱ्या सरपटणाऱ्या प्राण्याना कोणीही मारू नये.असा सबुरीचा सल्ला राजेश पाटील यांनी शेवटी शेतकरी, नागरीक यांना दिला आहे.

अवश्य वाचा