मुंबई, दि. 9 

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित 'जय महाराष्ट्र' दूरदर्शनवर व आकाशवाणीवरील ‘दिलखुलास’ कार्यक्रमात 'विशेष मिशन इंद्रधनुष्य -2 लसीकरण मोहीम' या विषयावर आरोग्य विभागाच्या संचालक डॉ. अर्चना पाटील यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे.

ही मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून मंगळवार दि. 10 डिसेंबर रोजी संध्याकाळी 7.30 वाजता प्रक्षेपित होणार आहे. तर राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून बुधवार दि. 11 आणि गुरुवार दि. 12 डिसेंबर रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल. निवेदिका रेश्मा बोडके यांनी ही मुलाखत घेतली आहे.

‘मिशन इंद्रधनुष्य’ या मोहीमेचे ध्येय, लसीकरणाचे वेळापत्रक, मोहिमेत सहभागी शासनाचे विविध विभाग, लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी करण्यात येत असलेले प्रयत्न, प्रधानमंत्री मातृवंदना योजना व  तिची वैशिष्ट्ये आदी विषयांची माहिती 'जय महाराष्ट्र' व ‘दिलखुलास’ या कार्यक्रमातून डॉ. पाटील यांनी दिली आहे.

या कार्यक्रमात आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीपकुमार व्यास, आरोग्य आयुक्त डॉ.अनुपकुमार यादव, जागतिक आरोग्य संघटनेचे लसीकरण व सर्वेक्षण अधिकारी डॉ. मुजीब सय्यद यांचे मार्गदर्शनपर आवाहनही या कार्यक्रमातून प्रसारित करण्यात येणार आहे.

अवश्य वाचा