बोर्लीमांडला

रायगड जिल्ह्यात सदृढ व्यक्तीचे क्रिकेट,कबड्डी ,व्हॉलीबॉल, फुटबॉल, आदीसारखे संघ आहेत.ह्याच्या स्पर्धा होताना आपल्या दिव्यांग व्यकींचा ही संघ असावा अशी कल्पना रायगड जिल्हयातील काही अपंग व्यक्तीच्या मनात आले त्याप्रमाणे दिव्यांग व्यक्तीचा संघ बनविणे म्हणजे गगनाला अवशान घालण्यासारखे होते. 

ज्यावेळी अपंग बांधवांनी या संदर्भात चर्चा करीत असत त्यावेळी सदृढ व्यक्ती हे दिव्यांग व्यकींची टिंगलटवाळी करीत असे आणि म्हणत की गावात तयार होणारा संघातली सभासदांमध्ये कधी कधी मतभेद होऊन त्या संघामध्ये फूट पडून दोन संघ होतात.आमच्या संघाचे खरे नाही मग तुमच्या सारख्या दिव्यांग व्यक्ती हे जिल्ह्यातील अपंगांना एकत्र आणून संघ तयार करणार हे अवघड काम आहे.तरी तुम्ही क्रिकेट संघाचा नाद सोडून फक्त सदृढ व्यक्तीचा खेल पहा.बाकी कुठल्या भांडगडीत पडू नका नाहीतर पहिलेच अपंग.आणि त्यात काही कमी जास्त झाले तर फुकटच घरच्यांना त्रास.   सदृढ व्यक्ती यांच्या ह्या बोलण्याने दिव्यांग व्यक्तीचे मन हे खचले गेले.मात्र खच्चीकरण झालेले  असताना आपण  आपली जिल्ह्यातील अपंग याना एकत्र आणून त्यामधून ठराविक खेळाडू निवडून आपण आपली दिव्यांग क्रिकेट संघ तयार करायचा आणि दिव्यांग व्यक्तीकडे हीन नजरेने पाहणाऱ्याना त्याची जागा दाखवायची असा चंग बांधला.

दरवर्षी राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले जाते. मात्र यावर्षी रायगडचा दिव्यांग क्रिकेट क्लब याने सहभागी व्हावे अशी इच्छा रायगड जिल्हा अपंग संघर्ष समिती चे अध्यक्ष साईनाथ पवार यांच्या कडे बोलुन दाखविले. त्याला साईनाथ पवार यांनी हिरवा कंदील दाखविला. त्यानुसार रायगड जिल्ह्यातील खेळाडू हे एकत्र आले.

रायगड जिल्हा समविचारी संघटनंचे अध्यक्ष  साईनाथ पवार यांनी  संघटनेतील सभासदांना संघ तयार करण्याविषयी कल्पना देऊन आपल्यातील क्रीडा कौशल्ये दाखवायची वेळ आली आहे .त्यासाठी आपण आपल्या परिचयातील मात्र त्या खेळाडू व्यक्तीचा शोध घेतला आणि पुढच्या पंधरा दिवसात बावीस दिव्यांग व्यकींचा संघ तयार करण्यात आला.आणि त्या संघाला नाव दिले गेले दिव्यांग क्रिकेट क्लब रायगड. ह्या संघाची स्थापना १४एप्रिल २०१७ रोजी म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या दिवशी अलिबाग येथे करण्यात आली.त्याला साईनाथ पवार यांनी हिरवा कंदील दाखविला. त्यानुसार रायगड जिल्ह्यातील खेळाडू हे एकत्र आले. 

 

 रायगड दिव्यांग क्रिकेट संघामध्ये काही खेळाडू हे राज्यस्तरीय स्पर्धेत खेळले आहेत. ह्या खेळाडूंना टेनिस आणि सिझन  क्रिकेटचा अनुभव आहे.अपंग खेळाडू करीत असलेला सराव पाहण्यासाठी येऊन त्यांना दाद देतात.

रायगड दिव्यांग क्रिकेट संघामध्ये काही खेळाडू हे राज्यस्तरीय स्पर्धेत खेळले आहेत. ह्या खेळाडूंना टेनिस आणि सिझन  क्रिकेटचा अनुभव आहे.अपंग खेळाडू करीत असलेला सराव पाहण्यासाठी येऊन त्यांना दाद देतात.

शाररिक दृष्टीया सदृढ असतानाही जिथे क्रिकेट खेळणे शक्य होत नाही तिथे हे खेळाडू स्वतःमधील असलेल्या व्यंगावर मात करीत सहज पणे नैसर्गिक खेल दाखवीत आहे. 

शाररिक दृष्टीया सदृढ असतानाही जिथे क्रिकेट खेळणे शक्य होत नाही तिथे हे खेळाडू स्वतःमधील असलेल्या व्यंगावर मात करीत सहज पणे नैसर्गिक खेल दाखवीत आहे.  संघातील सभासदांना अलिबाग हे अंतर सरावासाठी अनुकूल नसल्याने रोहा तालुक्यतील धाटाव येथे काही काळ सराव केला होता.

आणि मे २०१७ मध्ये बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात राज्यस्तरीय क्रिकेटची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती त्या स्पर्धेत रायगड संघाला दुसऱ्या स्थानी समाधान मानावे लागले होते.2018 मध्ये रत्नागिरी जिल्ह्यात झालेल्या दिव्यांग क्रिकेट स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला होता.मुंबई क्रिकेट असोसिएशन फोर दि डिसेब्लब आयोजित १९वी  मुंबई महापौर चषक २०१९ ह्या दोन दिवशीय दिव्यांग क्रिकेट रायगड संघाने कल्याण संघाचा पराभव करीत स्पर्धेचा मानकरी  ठरला होता.

 आगामी दिव्यांगा साठी राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन रायगड दिव्यांग क्रिकेट संघाने 12 व 13 डिसेंबर रोजी पेण येथे केले आहे.या स्पर्धेत राज्यभरातून16 दिव्यांग संघ सहभागी होणार असल्याची माहिती समविचारी संघटनंचे अध्यक्ष  साईनाथ पवार यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले

 

अवश्य वाचा

संजू सॅमसनला अखेर संधी