खालापूर 

     खालापूर तालुक्यातील असणाऱ्या खरीवली गोठीवली गोहे करंबेळी नंदनपाडा या गावांमध्ये एमआयडीसी येऊ घातली आहे मागील वर्षभरात मुंबई पुण्यातील धनिकांनी स्थानिक दलालांच्या मदतीने मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्री सूर केली असताना खरीवली ग्रामस्थांनी होऊ घातलेल्या या  एमआयडीस ला विरोध सुरू केला आहे तसे लेखी निवेदनात शासन पातळीवर देण्यात आले आहे.

खालापूर तालुक्यात नारंगी आणि नावंडे येथे एमआईडीसी प्रस्तावित असताना खालापूर तालुक्याच्या छत्तीशी विभागात येणाऱ्या करंबेळी,गोहे,खरीवली आदी गावांत एमआयडीसी फेज 3 करिता भूसंपादनाची प्रक्रिया सुरु झाली आहे 29 नोव्हेंबर ला प्रांत कार्यालय कडून शेतकऱ्यांना नोटीसा देण्यात आल्या आहेत असे शेतकर्यांनी सांगितले आहे दरम्यान शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या नोटीस मध्ये शासन शेतकरयांना आपल्या भूसंपादन मोबदल्या बाबत काहीही स्पष्टता नसल्याचेही शेतकऱ्यांचं म्हणणं आहे एकूणच एमआयडीसी चा पूर्वानुभव पाहता खरीवली गावातील गावकऱ्यांनी आपल्या जमिनी न देण्याचा निर्धार केला आहे तसेच आम्ही आमच्या शेतजमिनी आम्ही देणार नसल्याचे निवेदन कर्जत खालापूर प्रांताधिकारी यांना सादर केले आहे तसेच कोणत्याही क्षणी आम्ही आमच्या खरीवली गावातील शेतजमिनी देणार नाही तसेच तीव्र आंदोलन देखील वेळेप्रसंगी करू असे ग्रामस्थांनी सांगितले मारुती पाटील विष्णू पाटील अशोक पाटील शांताराम पाटील भगवान पाटीलकुंडलिक पाटील भावना पाटील यांचे सह ग्रामस्थ देखील या एमआयडीसी ला विरोध करीत आहेत.

" खालापूर तालुक्यात शेतीला सोन्याचा भाव असल्याने शासन कवडीमोल भावात भूसंपादन करायच्या बाबतीत पाऊले टाकीत आहे खाजगी दलालांचा सुळसुळाट झाला असल्याने शेतकरी संभ्रमात आहे यात शेतकऱ्यांची मोठी फसवणूक होण्याचा धोका आहे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचा पारदर्शी कारभार वर संशय निर्माण झालाय तालुक्यात गोदरेज सह अन्य नव्या कारखानदारी आली असताना पुन्हा हा करंबेली फेज 3 चा घाट कश्यासाठी म्हणूनच आमचा याला तीव्र विरोध आहे अशी भूमिका खरीवली गावातील गावकरी शांताराम पाटील यांनी मांडली आहे".

अवश्य वाचा

संजू सॅमसनला अखेर संधी