पनवेल दि. 09

कलाप्रेमी 'सूर निरागस हो' या समूहाच्या वतीने ब्रह्मचैतन्य मासिक संगीत सभेचा दुसरा कार्यक्रम पनवेल येथील श्री. गोंदवलेकर महाराजांच्या मठामधे संपन्न झाला. 

संपन्न झाला. यामधे नवीन पनवेल येथील ज्येष्ठ गायक मिलिन्द गोखले यांचे गायन संपन्न झाले. त्यानी राग मधुवंतीने मैफिलीला प्रारंभ केला. त्यातील विलंबित व द्रुत बंदिश सादर करून वातावरणनिर्मिती केली. नंतर त्यांनी एक ठुमरी पेश करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. त्यानंतर विविध अभंग, रामभजन, नाट्यगीत आदी प्रकारांचे स्वरभावपूर्ण सादरीकरण करून गीतरामायणातील "गी बाळानो श्रीरामायण" या भैरवीने मैफिलीची सांगता केली. पनवेलमधील संगीत अलंकार नंदकुमार कर्वे यांनी संवादिनी व युवा वादक आदित्य उपाध्ये आणि गिरिश घाणेकर यांनी तबलासाथ तर हर्षल पाटील यांनी पखवाजसाथ केली. 

 या कार्यक्रमाला पं जितेंद्र अभिषेकी यांचे शिष्य डॉ. मोहन दरेकर व प्रसिद्ध तबलावादक पं. किशोर पांडे यांच्यासह पनवेलकर रसिकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. 'सूर निरागस हो' समूहाचे संस्थापक गिरिश घाणेकर, किरण बापट यांच्यासह  मिलिंद काळेले, पंढरीनाथ पाटील, चंद्रकांत मने, अतुल जोशी, देवेन मराठे, मेघा इंगळे, विनायक प्रधान, कीर्तनकार हर्षदबुवा मांजरेकर या सभासदानी ही संगीत सभा संपन्न करण्यासाठी मोलाचे योगदान दिले. 

अवश्य वाचा

संजू सॅमसनला अखेर संधी