महाड-दि.९ डिसेंबर  

महाड एमआयडीसी तील रासायनिक कारखानदारी मुळे तालुक्यांमध्ये प्रदुषणाची समस्या गेल्या अनेक वर्षा पासुन असताना शासनाला या परिसरांतील प्रदुषण पुर्णपणे नियंत्रणा मध्ये आणण्यांत यश आले नाही.या परिसरांतील अनेक कारखान्यांतुन बेकायदेशीर केमिकल बाहेरुन आणले जाते,त्याचा साठा बंद असल्या कारखान्यांतील इमारती मध्ये केला जातो. त्यांतुन मोठ्या प्रमाणांत प्रदुषण तर होतेच परंतु या मुळे जवळच्या गावांना कायमचा धोका निर्माण झाला आहे. प्रदुषण मंडळ आणि पोलिसांकडून जाणिव पुर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप साकडी, कुसगाव, शेलटोली, खैरे,आसनपोई इत्यादी गावांतील ग्रामस्थांनी केला आहे.

सन १९८१ मध्ये ज्या वेळी महाड औद्योगिक वसाहतीची स्थापना करण्यांत आली त्या वेळी ही वसाहत रासायनिक कारखानदारी करता उभारण्यांत येत असल्याचे जाहिर करण्यांत आले.स्थानिक भूमिपुत्रांनी औद्योगिक वसहाती साठी आपल्या शेत जमीनी दिल्या,कारखनदारी उभी राहीली,आणि त्या नंतर या कारखान्यांतून बाहेर पडणारे दुषित रासायनिक पाण्या मुळे तालुक्याचे संपुर्ण जनजीवन विस्कळीत झाले.प्रदुषणचा भस्मासुर संपुर्ण महाड तालुक्यामध्ये पसरला आणि पहाता पहाता शेती,नदी,नाले ओढे सर्व काही दुषित झाले.कारखानदारीचे जे स्वप्न स्थानिक जनतेने पाहिले होते ते माती मोल झाले.या घटनेला आज पस्तीस वर्षा पेक्षा अधिक काळ गेला,आजही प्रदुषणाची समस्या सुटलेली नाही.१९९०च्या सुमाराला या परिसरांमध्ये सुमारे ३५० छोटे मोठे कारखाने सुरु होते आज केवळ ९५ कारखाने कार्यरत आहेंत त्यांतील ४० कारखाने केमिकल उत्पादन करणारे आहेंत.या कारखान्यांतुन बाहेर पडणारे दुषित पाणी आजही नदी नाल्या मध्ये सोडले जाते. त्याच बरोबर वापरण्यांत आलेले घातक रसायनाचा साठा भंगार म्हणुन करण्यांत येतो.अश्या प्रकारची रसायन साठा असलेली भंगाराची गोदामे साकडी, कुसगाव, टेमघर, खेरे, शेलटोली गावा जवळ आहेंत,या कडे प्रदुषण नियंत्रण मंडळ,पोलिस,महसुल या विभागां कडून जाणिव पुर्वक दुर्लक्ष केले जाते.औद्योगिक वसाहतीच्या स्थापने पासुन अनेकदा भंगाराच्या गोदामांना आग लागल्याच्या घटना घडल्या,ग्रामस्थ आपला जीव मुठीत घरुन त्या परिसरांमध्ये राहात आहेंत,बहूतांशी गोदामे बेकायदेशीर असुन अश्या गोदामांना शासनाचा परवाना देखिल नसल्याचे आढळून आले आहे.बेकायदेशीर रसायनाचा साठा करणे,चोरीचा माल घेणे इत्यादी प्रकार वारंवार घडत असताना पोलिस आणि प्रशासनाचे भंगार व्यावसायीकां जवळ संबध असल्याने कोणतीही कारवाई केली जात नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे.

येथील औद्योगिक वसाहतीमध्ये अमोरिया,क्लोरो सल्फाईड,हेक्झॉन इडीसी,बेंझिन अ‍ॅसेटोन,एलपीजी गॅस,एच अ‍ॅसिड इत्यादी स्वरुपाच्या घातक रसायनाचा वापर केला जातो.यांतुन वायु आणि जल प्रदुषण प्रचंड प्रमाणांत होते.आज या परिसरांत जे कारखाने बंद करण्यात आले त्यांच्या इमारती रिकाम्या अवस्थेमध्ये आहेंत.त्याचा वापर टाकावू आणि घातक रसायनाचा साठा करण्यासाठी केला जातो.सर्व बंद कारखान्यांची नोद एमआयडीसी कार्यालय आणि प्रदुषण नियंत्रण मंडळा कडे आहे,परंतु त्या केवळ कागदोपत्री बंद दाखविण्यांत आल्या आहेंत प्रत्यक्षांत त्या कारखान्यांतुन बेकायदेशीर केमिकलचा गोरख धंदा गेल्या अनेक वर्षा पासुन उघडपणे केला जात असताना त्या कडे मात्र दुर्लक्ष करण्यांत येत आहे.कांही दिवसा पुर्वी या परिसरांतील लक्ष्मी कॉम्प्युग्राफिक  वंâपनी मध्ये ठेवण्यांत आलेले रसायनाचे पिंप पावसाळ्यांमध्ये ओतण्यांत आल्याचे आढळून आले होते.या वंâपनीमध्ये पावसाळी शेड देखिल उभारण्यांत आली आहे परंतु प्रत्यक्षांमध्ये ही वंâपनी बंद असल्याची नोद एमआयडीसी कडे करण्यांत आली आहे.या परिसरांमध्ये असलेल्या कचNयांतुन वंâपनीच्या नावाचे लेटरपॅड सापडले,त्यावर असलेल्या दुरध्वनी वरुन संपर्वâ साधण्याचा प्रयत्न करण्यांत आला परंतु उत्तर देण्यांत आले नाही.वंâपनीच्या लेटर पॅडवर ग्राफिक डिझायनिंग आणि ऑफसेट प्रिंटींग असा उल्लेख करण्यांत आलेला असताना ही वंâपनी रासायनिक झोन मध्ये आहे.प्रत्यक्षांत सदरची वंâपनी सुरु असल्याचे अद्याप कोणीही पाहीलेले नाही.मात्र रात्रीच्या अंधारा मध्ये या वंâपनीमध्ये अवजड वाहानांतुन रसायनाच्या टाक्या आणुन ठेवल्या जातात,वंâपनीमध्ये सुरक्षा रक्षक नाही,कर्मचारी नाही,सर्व टाक्या बेवारस ठेवण्यांत आलेल्या असताना एमआयडीसी अधिकारी अथवा पोलिस  कोणतीही चौकशी करताना आढळून आले नाहींत.भविष्यांमध्ये घातपात होण्याची शक्यता नाकारता येत नाही या साठी कठोर कारवाई करणे आवश्यक आहे.

महाड औद्योगिक वसाहती मध्ये जे कारखाने बंद करण्यांत आले आहेंत त्याची नोद प्रदुषण नियंत्रण मंडळा प्रमाणे एमआयडीसी कार्यालयामध्ये देखिल करण्यांत आली आहे.कारखाने बंद असताना बेकायदेशीर उद्योग केले जात असतील तर एमआयडीसीने त्याची नोद घेऊन कारवाई करणे आवश्यक असल्याचे मत प्रदुषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी औटी यांनी व्यक्त केले.

अवश्य वाचा

संजू सॅमसनला अखेर संधी