खरोशी 

         संयुक्त विस्फोटक नियंत्रक नवी मुंबई यांनी व्ही एस पाटील सोसायटीतर्फे विनायक सदाशिव पाटील मुक्काम  खोपटे तालुका उरण जिल्हा रायगड यांना मौजे खरोशी तालुका पेण येथील गट नंबर 205/ 7 या जागेमध्ये स्फोटक पदार्थ साठविण्या करिता पत्र क्रमांक A/E/WC/MH/22/ 2399 (E103230) दि.14/8/2017अन्वये प्रारूप मान्यता दिलेली आहे त्या अनुषंगाने अर्जदार वी.एस.पाटील सोसायटी तर्फे विनायक सदाशिव पाटील  यांना स्फोटक पदार्थ साठवण्यासाठी देऊ नये या साठी सर्व गावकरी बंधू एक येऊन कायमचा विरोध करत आहेत.

            दोन वर्षांपूर्वी केलेला अर्जाची नोटीस ही 16नोव्हेंबर 2019रोजी जिल्हाधिकारी अलिबाग यांनी ग्रामपंचायत खरोशी यांना दिली होती माञ ती नोटीस ग्रामपंचायत ने  प्रसिद्ध न करता  6डिसेंबर2019 रोजी गावात नोटीस बोर्डवर व सार्वजनिक ठिकाणी  लावल्याने एकच खळबळ उडाली आणि या कामाला गावकरी बांधुनी कडाडून विरोध केला आहे.  रविवारी आयोजित केलेल्या गाव मिटिंगला  गावातील. वसंत गावंड. श्रीधर घरत महेश पाटील, जनार्दन  पाटील, महेश घरत   किशोर घरत, गावपंच. दशरथ पाटील शंकर घरत. राजा घरत. नंदकुमार घरत. रमाकांत ठाकूर रघुपती पाटील. ग्रामपंचायत सदस्य. मानसी घरत. गंगाराम पाटील भूषण पाटील यांच्यासह  गावातील ग्रामपंचायत सदस्य  गावपंच तरूण मंडळ महिला मंडळ  बचत गट भजनी मंडळ  हरिपाठ मंडळ यांच्यासह सुशिक्षित महिला व पुरूषांनी सहभाग घेऊन कायमचा विरोध दर्शवला आहे.

  

अवश्य वाचा

संजू सॅमसनला अखेर संधी