पनवेल दि.09 

            अबोली महिला रिक्षा संघटनेतर्फे रिक्षा व्यवसाय करण्यासाठी इच्छूक महिलांना नवीन पनवेल येथे मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. वाढत्या महागाईमुळे कुटूंब चालवताना महिलांना कसरत करावी लागते. त्यामुळे आपणही काहीतरी व्यवसाय करावा अशी इच्छा महिलांमध्ये असते. परंतु व्यवसाय करण्यासाठी भांडवल तसेच मार्गदर्शन मिळत नसल्याने इच्छा असूनही त्या व्यवसाय करु शकत नाहीत आणि हेच ओळखून अबोली महिला रिक्षा संघटनेतर्फे भांडवलाअभावी व्यवसाय करु न शकणार्‍या महिलांसाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध करुन देण्यात आली असल्याचे या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष भगत यांनी सांगितले. पनवेल प्रादेशिक परिवहन उप अधिकारी हेमांगीनी बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सदर प्रशिक्षण होत आहे.

             रिक्षा व्यवसाय करण्यासाठी लागणारे बॅच, लायसन्स व रिक्षा चालविण्याचे प्रशिक्षण घेणे गरजेचे असते. अबोली महिला रिक्षा संघटनेतर्फे इच्छूक गरीब महिलांसाठी बॅच, लायसन्स व रिक्षा चालविण्याचे प्रशिक्षण मोफत देण्यात येणार आहे. डिसेंबर महिन्यातच हे प्रशिक्षण सुरु होणार असल्याची माहिती अध्यक्ष संस्थापक संतोष भगत तसेच उपाध्यक्ष शालिनी गुरव, सचिव विलास मोरे, खजिनदार ललिता राऊत यांनी दिली. अधिक माहितीसाठी अध्यक्ष संस्थापक तथा रायगड पनवेलचे संपादक संतोष भगत यांच्याशी 8451882100 किंवा 9167014781 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन संघटनेतर्फे करण्यात आले आहे.

अवश्य वाचा

संजू सॅमसनला अखेर संधी