खरोशी 

  रायगड जिल्ह्याला खोपडी दारु कांड आणि स्पिरिट कांड याचा  इतिहास असताना या दोन्ही दारू कांडात  जवळपास १०० हून अधिक जणांचा बळी गेला होता आजही रायगड जिल्ह्यासह पेण मध्ये जावळी व आसपासच्या भागांमध्ये हातभट्टी आणि गावठी दारूचे उत्पादन व विक्री राजरोसपणे चालू आहे. 

 पेण  तालुक्यातील जावळी व निधवली ग्रुप ग्रामपंचायत व आसपासच्या आवारात अनेक दिवसापासून बेकायदेशीर गावठी दारूचे उत्पादन व खुलेआम विक्री  सुरू असून जावळी  ग्रुप ग्रामपंचायत येथे जंगल भागात दारू तयार केली जाते व त्यामुळे तालुक्यातील दारू उत्पादन हा छोटा घरगुती व्यवसाय होत चालला आहे परंतु या प्रकरणाकडे दारूबंदी खाते व अधिकारी नसल्यामुळे दारू बनविणारे  व विक्री करणाऱ्यांना आनंद मिळत असल्याचे चित्र दिसते.

    गाव वाडीतील नागरिक महिला वर्ग यासंदर्भात पोलिस निरीक्षक पेण रायगड यांना जावळी,  निफाड व करोटी आसपासच्या ग्रामपंचायतीच्या हद्दीतील दारूबंदी करण्याबाबत ग्रामस्थां मार्फत निवेदन देण्यात आले असून प्रशासनाने लक्ष देऊन गावठी दारू  चालू असलेली दारूविक्री बंद करण्याची मागणी जावळीतील  ग्रामस्थांनी दारूबंदी व महसूल विभाग पोलिस प्रशासनाला निवेदनाद्वारे करण्यात आली जोपर्यंत अशी अवैध दारू निर्मितीची केंद्र उद्ध्वस्त होणार नाही तोवर हा प्रश्न कायमचा सुटणार नाही. गावठी दारू बंद झाली तर गरिबी आणि व्यसनाधीनतेच्या आहारी गेलेला आदिवासी आणि कातकरी समाज व्यसनांपासून दूर होण्यास मदत होऊ शकेल. यासाठी वनविभाग, पोलीस विभाग आणि राज्य उत्पादन शुल्क विभागात समन्वय असणे गरजेचे आहे. तिन्ही विभागांकडून यासाठी गावठी दारू विरोधी कारवाई मोहीम राबवणे गरजेचे आहे. त्याचबरोबर अवैध दारू उत्पादन करणाऱ्याविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करणे यासारखी पावले उचलणे गरजेचे आहे.

अवश्य वाचा

संजू सॅमसनला अखेर संधी