पाली/बेणसे 

  प्रादेशिक  विद्या प्राधिकरण राज्य विज्ञान शिक्षण संस्था नागपूर व अगस्त्या इंटरनॅशनल फाऊंडेशन तर्फे आयोजित जिज्ञासा -2019 हे राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन चिपळूण येथे नुकतेच संपन्न झाले. यामध्ये रायगड जिल्ह्यातील  राजीप शाळा साळवींडे चे शिक्षक संदीप जाधव यांना शैक्षणिक प्रकारात महाराष्ट्र राज्यातून प्रथम क्रमांक मिळाला आहे. 

   18 व 19 डिसेंबर 2019 ला iiser पुणे येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील विज्ञान प्रदर्शनासाठी संदिप जाधव यांची निवड झाली आहे. त्यामुळे संदीप जाधव यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. महाराष्ट्र राज्यातून प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल राज्य विज्ञान शिक्षण संस्था नागपूर चे डॉ. आर. पी. अवसरे यांच्या हस्ते गोल्ड मेडल, ट्रॉफी व रोख रक्कम 7 हजार रुपये असे पारितोषिक देऊन सन्मानित जाधव यांना सन्मानित करण्यात आले. शिक्षक संदिप जाधव हे अतिशय होतकरू व उपक्रमशील शिक्षक म्हणून प्रसिद्ध आहेत. विविध नवोपक्रमाद्वारे ते आपल्या विद्यार्थ्यांच्या ज्ञानाच्या कशा नेहमीच रुंदावत असतात. आता ते महाराष्ट्राचे नाव संपूर्ण देशात करणार आहेत. त्यामुळे त्यांच्या या यशाचे जिल्हा तसेच राज्यातून सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. 

अवश्य वाचा

संजू सॅमसनला अखेर संधी