सांगोला

दर रविवारी भरणार्‍या सांगोला आठवडा बाजारात कायम मोकाट ङ्गिरणार्‍या जनावरांमुळे व्यापारी वर्ग त्रस्त झाला असून या मोकाट जनावरांचा त्रास बाजारात खरेदीसाठी येणार्‍या नागरिकांनाही सहन करावा लागत आहे. त्यामुळे सांगोला नगरपालिकेने आठवडा बाजारात कायम मोकाट ङ्गिरणार्‍या जनावरांचा तात्काळ बंदोबस्त करण्याबाबत लक्ष देण्याची गरज असल्याचे व्यापारी वर्गामधून मागणी होत आहे.

दुष्काळाने होरपळलेल्या व अवकाळी पावसाने झोडपलेल्या सांगोला तालुक्यात भाजीपाला  विक्रीसाठी व्यापार्‍यापेक्षाही छोटे शेतकरी मोठ्या प्रमाणात आठवडा बाजारात येतात. तर भाजीपाला खरेदीसाठी व इतर बाजारातील वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकही मोठ्या प्रमाणात येत असतात. रात्रंदिवस शेतात राबून, महागडी औषधे ङ्गवारुन, व पाणी देवून भाजीपाला पिकवणार्‍या शेतकर्‍यांचा माल आठवडा बाजारातील मोकाट जनावरे मोङ्गत मध्ये खावून ङ्गस्त करत आहेत.

सध्या आठवडा बाजारात भाजीपाल्याचे दर हे चांगले आहेत. अशावेळी शेतकर्‍यांना मोकाट जनावरांचा हकनाक त्रास सहन करावा लागत आहे. सदरची जनावरे ही खावून-पिवून धष्टपुष्ट बिनधास्त आठवडा बाजारात ङ्गिरत असताना ज्या शेतकर्‍याकडे भाजीपाला विक्रीसाठी आहे त्यात अचानक तोंड घालून भाजीपाल्याचे नुकसान करतात. १० ते २० रु.किंमतीची भाजीची पेंडी सहजच ही जनावरे आपल्या जबड्यात धरुन अनेकवेळा खाताना दिसतात.

शेतकर्‍यांबरोबर आठवडा बाजारात भाजीपाला खरेदीसाठी महिलांची संख्या प्रचंड असते. तर अनेक महिलांबरोबर बाजारात लहानमुले येतात. भाजीपाला खात असताना व्यापारी मोकाट जनावरांना हाकलण्याचा प्रयत्न करतात तेव्हा ही जनावरे मागचा  पुढचा विचार न करता नागरिकांना धक्के देत अगदी रुबाबात व थाटात धुमाकुळ घालतात. त्यामुळे व्यापार्‍यां बरोबर नागरिकांनाही मोकाट जनावरांचा त्रास होत असल्यामुळे सांगोला नगरपालिकेने अशा जनावरांचा कायमस्वरुपी बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.

अवश्य वाचा

रो- रो सेवा महागडी

रायगडातील कवींचा सन्मान.