९ डिसेंबर २०१९

म्हसळा तालुक्यातील रिक्त झालेल्या ग्रामपंचायत पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून खरसई ग्रामपंचायत मध्ये झालेल्या सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीत शेकाप, राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार निलेश मांदाडकर यांनी शिवसेना ,काँग्रेस पुरस्कृत उमेदवार कानू शीतकर यांचा ३३८ मतांनी पराभव केला.रविवारी दिनांक ८ मतदान पार पडले .तर सोमवारी सकाळी निकाल जाहीर करण्यात आले.या पोटनिवडणुकीत एकूण १३०२मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यापैकी निलेश मांदाडकर यांना ८११ तर कानू शितकर यांना ४७३ मते पडली.तर १८ मतदान नोटाला पडले.दोन वर्षांपूर्वी झालेल्या खरसई ग्रामपंचायत निवडणुकित शिवसेनेने एकहाती सत्ता मिळवत सरपंच पदी अनंत कांबळे हे निवडून आले होते. मधल्या काळात काही घटना घडल्या त्यानंतर अनंत कांबळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.त्यानंतर ही पोटनिवडणुक लागली होती.ही पोटनिवडणुक बिनविरोध व्हावी म्हणून निलेश मांदाडकर यांनी प्रयत्न केले होते.तर तालुक्यात अन्य झालेल्या ग्रामपंचायत सदस्य पोटनिवडणुकीत संदेरी येथे राष्ट्रवादीचे सुभाष भावे यांनी शिवसेनेच्या दिलीप नाक्ती यांचा ६० मतांनी पराभव केला.सुभाष भावे यांना १५० मते तर दिलीप नाक्ती यांना ९० मते मिळाली.तर नोटाला ५ मते गेली. तोंडसुरे पोटनिवडणुकीत विलास पवार यांना ७४ तर महाडिक परेश यांना ४८ मते मिळाली. या ठिकाणी नोटाला ३ मते मिळाली.विलास पवार हे २६ मतांनी विजयी झाले. तर लेप ग्रामपंचायत सदस्य पोटनिवडणुक बिनविरोध होऊन या ठिकाणी राष्ट्रवादीच्या मंजुळा लाड विजयी झाल्या.

म्हसळा तालुक्यात मागील झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला मोठ्या प्रमाणात लीड मिळाला होता. शिवसेनेला या झालेल्या पोटनिवडणुकीत पुन्हा उभारी घ्यायला संधी होती.पण त्यानी संधी गमावली असून पुन्हा एकदा शिवसेनेचा तालुक्यात सुफडा झाला.

अवश्य वाचा

संजू सॅमसनला अखेर संधी