गेल्या वर्षी डिसेंबर 2018 रोजी आम्ही सर्व मित्र किल्ले रायगडावर अभ्यासासाठी गेलो होतो त्यावेळी किल्ले रायगड चढत असताना हे हत्यार सापडले.

सकाळी लवकरच किल्ले रायगड चढण्यासाठी आम्ही सुरुवात केली होती. सोबत आठ मित्र अभ्यास आणि किल्ला समजून घेण्यासाठी माझ्या समवेत आले होते. किल्ल्याच्या सध्या खुबलढा बुरुजाची नवीन वाट बांधकाम करण्यासाठी बंद करण्यात आली होती. म्हणून किल्ल्याची जुनी शिवकालीन वाट म्हणजे सुप्रसिध्द नाणे दरवाजातून आम्ही किल्ल्यावर जाण्यास निघालो. किल्ल्याच्या अर्ध्या वाटेवर आम्ही विश्रांती साठी थांबलो असताना अभ्यासत्मक चर्चा चालू होती. त्यावेळी जमिनीत कसे आणि कोणते कोणते पुरावे सापडू शकतात याचे निरीक्षण चालू असताना लहान हिरव्या रंगाचे हे सूक्ष्म दगडी हत्यार सापडले. सुरवातीला हे नक्की हत्यार आहे याची जाणीव झाली पण अनुभवी तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली याची तपासणी झाल्याखेरीज हा उलगडा करणे म्हणजे अंधारात तिर मारून दिशाभूल करण्यासारखे झले असते म्हणून याचा उलगडा केला गेला नाही.

सदर हे हत्यार किल्ले रायगडावर सापडल्याने या किल्ल्याच्या डोंगराचे अस्तित्व लक्षात येत. किल्ल्याच्या परिसरात वाघबीळ नावाचे डोंगर असून यात काही वर्षा पूर्वी अनेक सूक्ष्म हत्यारे  पुरातत्वीय संशोधकांना सापडली आहेत. हे हत्यार रायगड किल्ल्यावर बांधकाम करताना रेतीच्या गोणी चढवत असताना त्यातून पडले असावे.

हे हत्यार अत्यंत लहान आकाराचे म्हणजे 2 सेंटिमीटर क्या आत लांबीला असून 4 ते 5 mm जाडीला आहे. रंग गर्द हिरवा काळपट असून त्याच्या दोन्ही बाजूला धार आजही चांगली आहे. 

या हत्यारांचा वापर मानव कातडी पासून मास वेगळे करण्यासाठी,झाडाची साल काढण्यासाठी व लहान लहान चिरा कापण्यासाठी एखाद्या ब्लेड प्रमाणे करीत असे.

बाळगायला अतिशय सहज,हलके व लहान असल्याने मानवाने आपल्या जीवनात अशी हत्यारे बनविण्याची चांगली कला अवगत केलेली पाहायला मिळते.

मानवास धातू चे ज्ञान अथवा धातूचा शोध लागण्या आधी तो या प्रकारची हत्यारे बनवत असे. नंतरच्या काळात धातूचा शोध लागल्यावर माणसाने आपल्या जीवनात क्रांती घडऊन आणली.

हे हत्यार साधारण 30 हजार वर्षापूर्वीच्या आधीचे असू शकते असा तज्ञानाचा अंदाज असूनु उत्तर पुराशम्युगात हे बनवलेले असावे.

सागर मुंढे.हे पुरातत्वीय अभ्यासक असून,पुरातत्व या विषयाचे विद्यार्थी आहेत.

सदर माहिती ज्येष्ठ पुरातत्व संशोधकांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यासून देण्यात आला आहे.

अवश्य वाचा

संजू सॅमसनला अखेर संधी